Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपण माणूस होऊया

Nari
, गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (08:19 IST)
शहरातील एका चर्चित दूकानात लस्सी ची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्र-मंडळी आरामात बसून एक दूसऱ्याची चेष्टा मस्करी करीत होतो‌. तेवढ्यात 70-75 च्या वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली.
 
तिची कंबर वाकलेली होती, चेहऱ्याच्या सुरकुत्यांमध्ये भुक तरंगत होती.
 
डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते. त्यांना बघून मनात न जाणे काय आले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन त्यांना विचारले, "आजी लस्सी पिणार का?" 

माझ्या असे विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त अचंभित झाले.
 
कारण, जर मी त्यांना पैसे दिले असते तर, फार तर 5 किंवा 10 रुपये दिले असते, पण लस्सी तर 25 रुपयाला एक होती. म्हणून लस्सी प्यायला दिल्याने मी गरीब होण्याची आणि त्या म्हाताऱ्या आजी कडून मी ठगला जाऊन श्रीमंत होण्याची शक्यता खुपच वाढली होती.
 
आजी ने संकोचून "हो" म्हटले व आपल्या जवळ जे मागून जमा झालेले 6-7 रुपये होते ते आपल्या कापऱ्या हातांनी माझ्यासमोर धरले. मला काही समजले नाही, म्हणून मी त्यांना विचारलं, "हे कशासाठी?"
 
"यात मिळवून माझ्या लस्सी चे पैसे भरून द्या बाबूजी !"
 
भावुक तर मी त्यांना पाहूनच झालो होतो... राहीलेली कसर त्यांच्या या वाक्याने पूर्ण केली.
 
अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या गळ्याने मी दुकानदाराला एक लस्सी वाढविण्यास सांगितले... आजीने आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व जवळच जमिनीवर बसली.
 
आता मला आपल्या लाचारीचा आभास झाला, कारण मी तेथे उपस्थित दुकानदार, आपले मित्र आणि इतर बऱ्याच ग्राहकांमुळे त्यांना खुर्चीवर बसायला सांगू शकलो नाही.
 
कोणी टोकणार तर नाही याची मला भिती वाटत होती...... की एका भिक मागणाऱ्या म्हाताऱ्या स्त्री ला त्यांच्या बरोबरीने बसवण्यावर कुणाला आपत्ती न व्हावी... पण ज्या खुर्चीवर मी बसलो होतो, ती मला चावत होती......
 
लस्सी ग्लासात भरून आम्ही सर्व मित्र आणि म्हाताऱ्या आजीच्या हातात येताच मी आपला ग्लास घेऊन आजीच्या जवळच जमीनीवर बसलो. कारण असे करण्यास मी स्वतंत्र होतो.... यावर कुणाला आपत्ती असण्याचे कारण नव्हते.... हां!

माझ्या मित्रांनी एक क्षण माझ्याकडे निरखून पाहिले... पण त्यांनी काही म्हणण्या आगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि माझ्याकडे हसत बघून, हात जोडून म्हणाला, "वर बसा साहेब! माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो !

- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Leukorrhea स्त्रियांच्या ल्युकोरियाच्या समस्येवर रामबाण उपाय