आत्ताच दिवस सुरू झाला...
आणि बघता बघता संध्याकाळ सुद्धा होण्यास आली......
सोमवार होता असे वाटत होते...
आणि शनिवार आलासुद्धा.
... महिना संपत आला,
... वर्ष संपायला आले,
... वयाची ४०, ५०, ६० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही.
... आपले आई-वडील, आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले. मग समजेना... आता मागे कसे फिरायचे?
जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घ्या.
आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...
आपल्या आयुष्यात रंग भरा ...
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या ...
हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करा ...
उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका...
... हे नंतर करीन,
... हे नंतर सांगीन,
... यावर नंतर विचार करीन,
'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे?
आपण हे समजून घेत नाही की...
चहा थंड झाल्यानंतर ...
प्राधान्य बदलल्यानंतर ...
उत्साह निघून गेल्यानंतर...
आरोग्य बिघडल्यानंतर ...
मुले वयात आल्यानंतर ...
आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...
आश्वासन न पाळल्यानंतर...
दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
आयुष्य संपल्यानंतर ...
...आपल्याला कळते,
...अरे बापरे...
उशीर झाला की ...
म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका.
'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात.
दिवस आजचा ...
आणि क्षण आत्ताचा ...
आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही कारण आता आपले वय उतरणीस लागले आहे.
बघूया की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोहोचवीत आहे?
कारण...
हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ...
... तर कदाचित तो पुढे कधीच पाठविला जाणार नाही.
जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंतसुद्धा हा संदेश पोहचवा.
सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा.
- सोशल मीडिया