Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्त्रियांची एनर्जी Feminine Energy

women
, बुधवार, 8 मार्च 2023 (10:04 IST)
प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते, 
ही एनर्जी पालन पोषण करणारी, प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे...
 
आकाशात सूर्य असतो तो दिवसभर काय करतो?  तो फक्त असतो त्याच्या असण्यानंच खूप काही होतं, तशीच ही ऊर्जा केवळ "असण्याची ऊर्जा" आहे.
 
ही एनर्जी घरात असल्यानं घरात स्नेह ओलावा, चैतन्य आहे, घरात उत्साह आहे, सौंदर्य आहे. तिनं काही करणं हे अतिशय सुंदर एक्स्ट्रा काम आहे, एनर्जीचा उपयोग करुन ती स्वयंपाक करते, घर सजवते पण कधी तिनं ही एनर्जी वापरुन काही केलं नाही तरी तिची किंमत कमी होत नाही, ती एनर्जी घरात आहे आणि ते असणंच एक समाज देणं आहे. घरासाठी तर वरदान आहे...
 
याचा अनुभव प्रत्येकाला आहे, 
एखाद्या एकट्या रहाणा️ऱ्या पुरुषाचं घर, बॅचलरच्या रुमचं उदाहरण घेऊ, 
तिथे गेल्यावर कसं वाटतं, ते अनुभवा. तिथे काहीतरी उणिव वाटते ती कसली?
तर फेमिनाईन एनर्जीच तिथं नाही....

किंवा घरातली आई/ पत्नी बाहेरगावी गेली आणि घरात इतर कोणतीही स्त्री नसेल तर घरात कसं वाटतं ते पण तपासा. दोन दिवस कदाचित बदल चांगला वाटेल, पण नंतर मात्र सगळी कामं करणारे सेवा देणारे असूनही काहीतरी रिकामं वाटेल, रुक्ष वाटेल. 
ती उणिव आहे केवळ स्त्री एनर्जीची
लग्न झाल्यावर लेक घर सोडून जाते तेव्हा घर रितं रिकामं होतं, 
ही ऊर्जा जाते, फक्त घरातली मुलगी नाही, ही ऊर्जा पण तिच्यासोबत जाते...
 
अगदी घरातलं लहान बाळ एखादी मुलगी असेल तर घरातलं वातावरण पहा आणि तिचं असणं म्हणजे काय ते पण फील करा. ती एनर्जी त्या नवजात मुलीतही आहे....
ही एनर्जी निसर्गाची निर्मितीची क्रिएशनची ऊर्जा आहे,
 
घरातली सगळी प्रगती, सगळयांचा विकास, सगळयांचं खुप पुढे जाणं, 
यश प्राप्ती होणं, यासाठी तीच एनर्जी वापरली जाते....
 
मुलांच्या अभ्यासातल्या यशासाठी हिच घराघरातली सरस्वती आहे, 
नव-याच्या आर्थिक यशाचं कारण हीच लक्ष्मी आहे...
 
घरातली प्रत्येक स्त्री काय देते? काय करते?
तर ती असते ! तिचं असणंच देणं आहे, तिनं आणखी काही करायची गरजच नाही, (तरी ती इतकं करते.)
तिच्या असण्याचीच किंमत खूप आहे जी पैशात मोजता येत नाही
.
 
जिथं अनादर आणि अपमान होतो,
तिच्या एनर्जीचं शोषण होतं, 
तिथं ती नकारात्मक होते, आणि 
सगळया घराला त्याचे परिणाम भोगावे लागतात,
म्हणूनच आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी म्हणून पूजा करायला सांगितलंय. 
पूजा प्रतिकात्मक आहे, पूजा म्हणजे आदर आणि कदर करणे...
आपल्या यशात आपल्या सुखात तिचा न दिसणारा वाटा मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे...!
मला वाटतं प्रत्येक स्त्रीला आपल्यातल्या या एनर्जीची खात्री पटली तर तिच्या मनातला अपराधीभाव आणि न्यूनगंड लगेचच जाईल.
 
वीजेसारखी ही ऊर्जा दिसत नाही, पण असते
एवढंच काय तर, स्त्रीच्या ऊर्जेवर घराचं घरपण टिकून असतं.
 
* तिच्या कामांमधून ऊर्जा अभिव्यक्त होते, आणि त्यामुळे इतरांना पुढे जाता येतं...कोणत्याही स्त्रीनं स्वतःची किंमत आपण नोकरी करतो की नाही, पैसा कमवतो की नाही, या निकषावर करायची गरज नाही.

*अनुकूल परिस्थिती नसेल आणि स्त्री आयुष्यातल्या ऋतु प्रमाणे कधी थांबावं लागलं तरी स्वतःला आळशी, निरुपयोगी समजू नका कारण निसर्गाची प्रचंड ऊर्जा पेलून इतरांना सहज देत तुम्ही स्थिर उभ्या आहात ज्यासाठी तुम्ही ताकत लावलेली आहे...हे घरात नुसतं बसणं नाही, हे घरात 'असणं' आहे जे अमूल्य आहे.
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tips For Career Development : चांगले करिअर घडवताना या गोष्टी लक्षात ठेवा