मी नुकताच अमेरिकेच्या शिकागो युनिर्व्हसिटीमधून एम.बी.ए. करून भारतात आलो होतो. अमेरिकेमध्ये मला चांगल्या पगारावर म्हणजे पन्नास हजार डॉलर महिन्याने जॉब मिळत होता. पण मला 'चॅलेजिंग जॉब' करायचा होता आणि मला तशी संधी लवकरच मिळाली. भारतात मे. शाह एण्ड शाह यांचा ऑटोमोबाईल पार्ट बनवायचा बिझनेस होता. त्याची युनिट्स देशामध्ये ठिकठिकाणी पसरलेली होती. त्यांचे पुण्याजवळ पिंपरी येथील युनिट बंद पडले होते. 'लेबर प्राब्लेम' हे त्याचे कारण. तिथली कामगार संघटना संघटित होती. मला अपॉइनमेंट देतानाच शाह एण्ड शाह कंपनीचे मालक जयंतीलाल शाह मला म्हणाले - 'हे बघा मि. पटवर्धन या जॉबसाठी आम्हाला तुमच्यापेक्षा अनुभवी व सीनियर लोक मिळत होते. पण आम्ही तुमचीच निवड केली. याच कारण तुम्ही यंग, फॉरेन रिटर्न व एनर्जेटिक आहात. तुम्ही काही करून तिथली युनियनची कटकटच मिटवून टाका. आपल्याला काहीही लफडं नकोय. तुम्ही आमचं बंद पडलेलं युनिट चालू करून दाखवाल हा आम्हाला भरवसा आहे. बाय हूक ऑर क्रूक. तुम्ही हे काम करून दाखवा. मला काही वांदा नाही. यानंतर आपण तेव्हाच भेटू जेव्हा तुम्ही बंद युनिट चालू झाल्याची सूचना द्याल. बरं, बेस्ट ऑफ लक. ओ के.' एवढं सांगून शेठजींनी मला निरोप दिला. मी विचारात पडलो. खरंच शेठजींनी माझ्यावर किती मोठा विश्वास टाकला होता. मी युनिट जॉइन केले. चालू असलेल्या कारखान्यांमध्ये हे बंद युनिट अगदीच भकास वाटत होते. बंद युनिटमध्ये मी कंपनी सेक्रेटरी आदित्य पटवर्धन, क्लार्क दळपुळे, माझा पी. ए. सुशील व माझा पर्सनल ड्रायव्हर काशीनाथ एवढेच लोक होतो. युनिट बंद पडायला कारणीभूत तिथल्या लेबर युनियन लीडर शांताराम होता. मग पी. ए. सुशीलला 'माझी व शांतारामची लवकरच भेट घडवून आणण्यास सांगितलं. ठरल्याप्रमाणे सुशील शांतारामाला गेस्ट हाउसमध्ये घेऊन आला. शांताराम हा सहा फूट उंचीचा आडव्या अंगाचा व काळाकुट्ट रंगाचा, राकट चेहर्याचा मनुष्य होता. तोंडातून पुढे आलेले दात व चेहर्यावर देवीच्या व्रणामुळे तो अधिकच भयानक दिसत होता. |
| शांताराम उठला व म्हणाला - साहेब तुमच्या सारखे बरेच आले आणि गेले. मला वीस हजार रुपयामध्ये विकत घेऊ पाहता काय? |
|
|
मी त्याला सोफ्यावर बसवलं आणि त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून म्हटलं ' हे बघ शांताराम तू मला खूपच समजदार व परिस्थितीला जाणून घेणारा हुशार मनुष्य वाटतो म्हणून तुला बोलावलं. शेठजीचा तर ही युनिट बंद करण्याचा विचार आहे. शेठजीचे कितेक कारखाने चालू आहे. त्याचं काहीही बिघडणार नाही. पण युनिट बंद होऊन 'ले ऑफ' झाला तर तू आणि तुझे चारशे कामगार उपाशी मरतील. आता त्यांना या वयात काम कुठे काम मिळेल. आता तूच जरा समजूतदारीने काम घे. सहा महिन्यापासून युनिट पूर्ण बंद आहे. पण जर तुम्ही संप मागे घेऊन बंद युनिट चालू करणार असाल तर मी प्रत्येक कामगाराला एक-एक हजार रुपये रोख देऊन व फक्त तुला एकट्यालाच वीस हजार रुपये इफिशियेंट वर्कर या नावावर चुपचाप पाकिटात घालून देईन. फक्त युनिट चालू झाली पाहिजे बोल काय म्हणतो? शांताराम बराच वेळ विचार करत राहिला. मला वाटला माझं बोलणं त्याला मान्य असावा. पण अचानक शांताराम उठला व म्हणाला - साहेब तुमच्या सारखे बरेच आले आणि गेले. मला वीस हजार रुपयामध्ये विकत घेऊ पाहता काय? प्रत्येक कामगाराला पूर्ण सहा महिन्याचा पुरा पगार मिळाल्याशिवाय युनिट चालू होणार नाही समजलं.! असं बोलून शांताराम माझी ऑफर नाकारून चालला गेला. |
| मी खोटी सहानभुती दाखवून म्हटलं - शांताराम खरंच फारच वाईट झालं. अस व्हायला नको होतं गाडी कोणाची होती, कोणी हा अपघात केला काही कळलं का? |
|
|
काही करून दाखवायला मिळालेल्या पहिल्याच संधीमध्ये मला अपयश आले. माझं डोकं सुन्न होऊन गेलं. एक चौथी नापास असलेला साधा कामगार, युनियन लीडर म्हणून माझ्यासारख्या हायली एज्युकेटेड मनुष्याचा अपमान करून निघून गेला होता. मी शेल्फमधून स्कॉच व्हिस्कीची बाटली काढली. एक लार्ज पेग घेतला. लगेच ड्रायव्हर काशिनाथाला फोन करून बोलवून घेतलं. दहा मिनिटातच काशीनाथ आला. मी त्याला पक्कं बजावलं व म्हटलं - 'काशीनाथ आता तूच माझं काम करून शकतो, मी त्याच्या करिता आपल्या हाताने पेग तयार केला व दिला पेग पोटात गेल्या नंतर काशीराम म्हणाला साहेब काय काम आहे. मी म्हटलं, काशीराम तू गाडी चालवतो. त्यात अपघात तर होतच राहतात. तुला शांताराम रस्त्यावर दिसेल त्याला तिथेच गाडीने धडक मार फक्त लक्षात ठेव मेला नाही पाहिजे, चांगला चार-पाच महिने हास्पिटलाईज झाला पाहिजे. तेवढ्या वेळात त्याचे कामगार खचून जातील व त्याचा संप आपोआपच बोंबलेल. तू खर्चाची काही काळजी करू नको कोर्ट, कचेरी पोलीस सर्व मी पाहून घेईन शिवाय या कामासाठी मी तुला तीस हजार रुपये देणार आहे'. असं म्हणून मी काशीनाथच्या समोर दहा-दहा हजाराच्या तीन गड्ड्या ठेवून दिल्या.
काशीनाथने इतके पैसे कधी आयुष्यात बघितले नसतील. तो पैसे घेऊन माझं काम करायचं आश्वासन देऊन निघून गेला, नंतर दोन दिवसांनी मला कळले की एका रोड एक्सीडेंटमध्ये शांताराम जखमी झाला आहे. तो हॉस्पिटलामध्ये एडमिट आहे. मी मुद्दाम मला काहीच माहीत नाही, असं दाखवत शांतारामाला पाहायला हॉस्पिटलमध्ये गेलो. शांतारामचे दोन्ही पाय कापावे लागले होते. त्याची बायको व पोरं रडत होते. मी खोटी सहानभुती दाखवून म्हटलं - शांताराम खरंच फारच वाईट झालं. अस व्हायला नको होतं गाडी कोणाची होती, कोणी हा अपघात केला काही कळलं का? कंपनी तुला जे काही कंपनसेशन देईल ते देईल पण मी तुला स्वतः:कडून दहा हजार रुपये खर्चासाठी देत आहे तू नही म्हणू नको? असं म्हणत मी दहा हजार रुपये त्याच्या पलंगावर ठेवून दिले.
शांताराम म्हणाला- साहेब अंधार होता. कदाचित चूक माझीही असेल. मी पण रस्ता ओलांडताना सावध नसेल. पण जे वाहायचं होत ते होऊन गेलं. त्याला कुणी काय करणार? पण मला दु:ख या गोष्टीचं आहे की मी इतक्या दिवस कामगारांसाठी चालवलेला लढा संपुष्टात आला. मी इथे आता पडल्यावर कामगारांच धैर्य पण खचू लागलं आहे. ते तरी किती दम धरणार. आता त्यांचा पुढारीच हॉस्पिटलामध्ये असा पडलाय तर लढा कसा चालणार. बहुतेक कामगार कामावर आल्याचं कळतंय. येऊन आपण मोठे माणूस आहात. आपलं मनही मोठं आहे. आपण त्या दिवशीची माझी वागणूक विसरून माझ्यासाठी स्वत:कडून दहा हजार रुपयाची मदत घेऊन आलात. खरंच आपण मोठ्या मनाचे देवमाणूस आहात.
मी शांतारामचा निरोप घेतला व तेव्हाच माझ्या मोबाईलवर शेठजीचा फोन आला - 'काग्रेंच्युलेशन मि. पटवर्धन, तुम्ही आमचे बंद युनिट पुन्हा चालू करून दाखवलेत. मी तुम्हाला प्रमोट करून तिथला मॅनेजिंग डायरेक्टर (M.D) अपॉइंट केले आहे, त्याच बरोबर मला दोन्ही पाय गमावून अपंग झालेल्या शांतारामाचे शब्द आठवले 'साहेब तुम्ही मोठ्या मनाचे देवमाणूस आहात' आणि मी विचार करीत होतो की आपल्या यशस्वी होण्याच्या हव्यासामध्ये माझं किती अध:पतन झाल होत.