Article Marathi Stories %e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae 109011000032_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकताचा जन्म

एकताचा जन्म
WDWD
'कुसूमला त्रास सुरू झाला', असा घरातून आवाज येताच बाहेर बसलेल्यांचे हात पाय गळाले. बाहेर कर्फ्यु होता. सर्वत्र जाळपोळ होत होती. अशा परिस्थितीत कुसुमला दवाखान्यात न्यायचे तरी कसे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. चौकाचौकात नागरिकांचा जमाव मोठ्या प्रमाणात जाळपोळ करत होता. काही भागात भोसकाभोसकीचे प्रकारही घडल्याचे समजत होते. अशा वेळी घरातून पाऊल बाहेर काढणे म्हणजे मृत्युच्या खाईत स्वत:हून उडी घेण्यासारखे होते. त्यात कुसूमच्या वेदना वाढत होत्या.

घरातल्या या कल्लोळाने शेजारी जागे होतात. अशा स्थितीत गल्ली बोळातून मार्ग काढत राम शकिल चाचाच्या घरी पोहचतो. संचारबंदी सुरू झाल्यापासून चाचांची रिक्षा धूळ खात घरासमोर उभा होती. रामने शकील चाचांना कुसुमची परिस्थिती सांगितली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत चाचा रामला म्हणाले, 'चल मेरे साथ.'

कुसुमसह घरातील दोन महिलांना घेऊन शकील चाचाची रिक्षा दवाखान्याच्या दिशने मार्गस्थ झाली. मात्र जे व्हायचे नाही तेच झाले, एका चौकात जमावाने चाचाची रिक्षा अडवली.

मुस्लिम ड्रायव्हरला पाहताच जमावाने चाचाला बाहेर ओढले. त्यांना लाथाबुक्क्यानी मारू लागले, 'मैं मुसलमान हू, मुझे बेशक रोक लो, लेकिन इस हिंदू बहन को जल्द अस्पताल पहुँचाओ, इसकी जान खतरे में है.' असे शकिल चाचा जमावातील नागरिकाना विनवणी करत सांगू लागले.

शकील चाचाला मारण्यासाठी उगारलेले हात त्यांच्या या बोलण्याने थांबले. चाचाला जमातील नागरिक रिक्षा सुरू करायला सांगतात. जमावातील तीन नागरिक त्या रिक्षात बसतात व कुसुमला दवाखान्यात पोहचवतात.

दवाखान्यात पोहचताच एक सुंदर नाजूक चिमुकली जन्म घेते. त्यानंतर उपस्थित नागरिक लगेच तिचे नामकरण करतात...एकता!

Share this Story:

Follow Webdunia marathi