Article Marathi Stories %e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2 %e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a5%80 108071900001_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरातील शिडी

घरातील शिडी
ND
घरात असलेल्या शिडीच्या जागी मोठी भिंत उभी करून टाका. दोन सख्ख्या भावांमधील झालेला निर्णय ऐकून त्या दोघांच्या बायकांसमोर मोठी समस्या उभी राहिली. दोघींमध्ये सलोख्याचे तसेच प्रेमाचे संबंध होते. मात्र दोघं भावांमध्ये नेहमी छत्तिसाचा आकडा असायचा. ऐके दिवशी घरातील खोली लहान पडते म्हणून दोघं भावांमध्ये मोठी खडाजंगी झाली व त्यांनी घरातील शिडीच्या जागी मोठी भिंत बांधून टाकण्याचा निर्णय घेऊन एक घाव दोन तुकडे करून टाकायचे ठरविले.

पण दोघी जावांना मात्र त्यांनी घेतलेला निर्णय मान्य नव्हता, त्यांनी आपापल्या पतीला समजावले की जर खोली लहान पडते म्हणून तुम्ही उगाच वाद घालता जर आपण शिडीच्या जागी भिंत न बांधता आपली स्वयंपाक खोली वाढविली तर खोली देखील मोठी होईल आणि शिडी पण कायम राहील, सांगून त्यांनी त्यांच्या हातात घराच्या नकाश्याचे कागद दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi