Article Marathi Stories %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%b2 %e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 108101400049_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चाहूल म्हातारपणाची

चाहूल म्हातारपणाची
ND
आज बर्‍याच दिवसांतर तो त्याचा चेहरा आरशात न्याहाळत होता. तेव्हा त्याला कानावरचे पांढरे केस व मिशीचे वाढलेले केस दिसले. ते पाहून त्याला हसू आवरले नाही.

घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर यामध्ये येरझार्‍या घालण्याच्या नादात तो स्वत:कडे लक्ष देऊ शकला नाही. या विचारात तो इतका मग्न होता की, त्याची बायको केव्हा त्याच्या मागे येऊन उभी राहिली हे त्याला कळलेच नाही. तिला मागे उभे पाहून तो दचकलाच.

''आज गाडी मूडमध्ये दिसतेय !' बायकोने विचारले.
'हो आहेच मुळी', असे म्हणून तो बायकोकडे बघायला लागला.
'काय झाले', असे म्हणत बायकोने त्याला मिठी मारली.
'बघ ना पाहता पाहता आपल्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाली, आपण म्हातारे तर होत नाही ना!' असं त्याने म्हणताच बायको मोठ्याने हसायला लागली.

Share this Story:

Follow Webdunia marathi