Article Marathi Stories %e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be 109032400033_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तमाशा

तमाशा
NDND
एकदा गावात एक जादूगर आला. तेथे तोबा गर्दी झाली होती. जादूगर जमूर्‍याला एका मागून एक प्रश्न विचारत होता. साधारण आठ- दहा वर्षाचा हा जमूरा जादूगाराकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे विनोदी उत्तर देत होता. त्याच्या डोळयावर पट्टी बांधलेली होती.

'सरपंच, साहेबाच्या खिशात काय आहे?'
जमूरा लगेच सांगायचा
'कंगवा'.
साहेब लगेच खिशातून कंगवा काढायचे. उपस्थित लगेच टाळ्या वाजवायचे.

'मावशीच्या पर्समध्ये किती रूपये आहे?'
दहाच्या चार नोटा'
मावशींनी दहाच्या नोटा मोजल्या. पुन्हा टाळ्या वाजल्या. अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरे होत राहिली. टाळ्या वाजत राहिल्या.

तमाशा समाप्त झाला. बघे काढता पाय घेऊ लागले. जादूगार व जमूर्‍याकडे काही फेकलेले पैसे जादूगर वेचत होता. जमुर्‍याने डोळ्यावरील पट्टी काढली. परंतु, तरीही त्याच्या डोळ्यासमोर अंधारच होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi