Article Marathi Stories %e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%b2 %e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%a2%e0%a5%87%e0%a4%9a 108071200004_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पचेल तेवढेच

- रामकृष्ण भगवंत अघोर

पचेल तेवढेच
ND
राधाबाई आपला मुलगा विरेंद्र याला घेऊन तावातावानी डॉक्टरांकडे आल्या. येताना विरेंद्रचा मित्र राघवेंद्र याला देखील सोबत त्यांनी आणले होते. विरेंद्र हा अशक्त होता तर राघवेंद्र हा तब्बेतीनी चांगला होता. विरंद्रचा आहार बेताचा होता, तर राघवेंद्रचा आहार भरपूर होता.

राधाबाई डॉक्टरांना म्हणाल्या, डॉक्टर साहेब, माझा मुलगा फारत अशक्त आहे. त्याला राघवेंद्र सारखे सशक्त करा.' डॉक्टरांनी विरेंद्रला तपासले आणि काय समजायचे ते समजले. त्यांनी थोडा विचार करून राधाबाईंना दुसरे दिवशी येण्यास सांगितले.

राधाबाई दुसरे दिवशी डॉक्टरांकडे गेल्या. तेव्हा त्यांना दोन रोपटे दिली आणि म्हणाले, ह्यातील एका रोपाला भरपूर पाणी द्या आणि दुसर्‍या रोपाला प्रमाणित पाणी द्या, आणि दोन महिन्या नंतर परत या.'

राधाबाई ती दोन्ही रोपो घेऊन घरी आल्या. दोन्ही रोपे आपल्या अंगणात लावली, आणि डॉक्टरांनी ज्याप्रमाणे रोपाला पाणी घालायला सांगितले, त्या पद्धतीने पाणी घालण्यास सुरूवात केली. दोन महिने पूर्ण झाले, तसे राधाबाई डॉक्टरांकडे गेल्या आणि आपण सांगितल्या प्रमाणे दोन्ही रोपांना पाणी घातले.

तेव्हा डॉक्टर म्हणाले, 'दोन्ही रोपे व्यवस्थित आहेत ना!'

राधाबाई मोठ्या आनंदाने 'हो' म्हणून मान हलविली. नंतर डॉक्टर राधाबाई बरोबर त्यांच्या घरी त्यांनी दिलेली रोपे कशी काय लागली आहेत हे पाहण्यासाठी गेले.

जेव्हा त्यांनी रोपाकडे पाहिले तेंव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. तेंव्हा राधाबाईनी त्यांच्या दु:खाचे कारण विचारले. तेंव्हा डॉक्टर म्हणाले, 'ह्या रोपाला भरपूर पाणी घालून ते कसे काय वाळून गेले?' असे विचारले. राधाबाईंना देखील त्याचे कारण समजले नाही.

तेव्हा डॉक्टर म्हणाले, 'तुम्ही दोन्ही रोपाला जेंव्हा पाणी घालायला चालू केले, तेंव्हा कोणत्या रोपाला किती पाणी लागते याचा अंदाज यायला हवा होता. दोन्ही रोपाला पाणी घातल्यावर कोणत्या रोपाची किती शोषणक्षमता आहे हे समजायला पाहिजे. या गोष्टीचा विचार न करता तुम्ही रोपाला पाणीच घालत राहिलात आणि त्यातील एका रोपाला अनावश्यक पाणी दिले गेल्याने ते रोप कुजून गेले.' डॉक्टरांचे म्हणणे ऐकताच राधाबाईना सर्व काही समजले.

राधाबाईंना असे वाटत होते की, आपल्या मुलाने म्हणजे विरेंद्र याने भरपूर खावे आलि लट्ठ व सशक्त व्हावे. पण त्याच्या पोटापेक्षा आणि भूकेपेक्षा तो जास्त खात नसे. आणि राधाबाई तर भरपूर खा असा आग्रह करत असे. या उलट राघवेंद्र याचा आहार भरपूर असे आणि त्याची पचनशक्ती विरेंद्र पेक्षा जास्त होती.

साहजिकच राधाबाईंना डॉक्टर कडून प्रयोगाद्वारे उत्तर मिळाले आणि त्यानंतर त्यांनी विरेंद्र मागेल तेवढेच खाण्यासाठी देऊ लागल्या. तेव्हापासून 'पचेल तेवढेच खावे' हे त्या शिकल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi