Article Marathi Stories %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be 108071900002_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रामाणिक भाजीवाला

प्रामाणिक भाजीवाला
ND
एकदा काय झालं भाजी बाजारात एक महिला भाजीपाला घेण्यासाठी आली. तिने भाजीवाल्याला टोमँटोचा भाव विचारला असता त्याने पाच रुपये पाव दिले असा सांगितला टोमॅटोच वजन करत असताना त्या महिलेने भाजीवाल्याचे लक्ष दुसरीकडे असल्याचा फायदा घेत तिच्या पिशवीमध्ये चुपचाप अधिक टोमॅटो टाकून घेतले व ठरलेले पैसे देऊन पुढे जाण्यास निघाली मात्र तेवढ्यात मागून तिला एक आवाज आला, अहो ताई थांबा जरा. ती महिला थोड्या वेळासाठी तर घाबरलीच होती. तिने आवाजाच्या दिशेने वळून पाहिले असता तो भाजीवाला त्या महिलेचे पैशांचे पाकिट घेऊन येत तिला म्हणाला, ताई तुम्ही आपले पाकीट माझ्या दुकानावर विसरल्यात.

महिलेने भाजीवाल्याच्या हातून पाकीट हिसकावले व ते उघडून पाहिले असता त्यात सर्व सहीसलामत होते. त्यावर तिने भाजीवाल्याला दहा रुपये देऊ केले परंतु त्याने ते नाकारले. भाजीवाल्याचा प्रामाणिक पणा पाहून भाजीवाल्याच्या नकळत जास्त टोमॅटो आपल्या पिशवीत टाकून घेणारी महीला मात्र चांगलीच खजल झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi