Article Marathi Stories %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80 %e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be 109070100033_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझी बिपाशा

- प्रकाश दांडेकर

माझी बिपाशा कथा साहित्य कविता साहित्यकार लेखक
IFM
मी कित्येक वर्षांपासून सिनेतारका बिपाशा बसूचा 'फॅन' आहे. तिच्या 'जिस्म' पासून तर अलीकडच्या 'रन' पर्यंत प्रत्येक पिक्चर मी 'फर्स्ट डे, फर्स्ट शो' बघितला आहे. घरीसुद्धा टि.व्ही. वर बिपाशाचं गाणं किंवा डान्स लागला की त्यावेळी मुलांनीसुद्धा चॅनल चेंज केलेलं मला आवडत नाही.

मी कित्येकदा विचार करतो की तो कोण भाग्यवान असेल ज्याच्याशी बिपाशा लग्न करेल? आपल्याला बिपाशासारखी सुंदर बायको का नाही मिळाली वगैरे-वगैरे. असेच दिवस जात होते. एका दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो, तर अंगणामध्ये एक लिफाफा पोस्टमनने टाकला होता.

उघडून पाहिला तर कळले की लॅक्मे टॅक्लम कंपनी नवीन टॅल्कम पावडर लॉंच करीत आहे. या नवीन प्रॉडक्टच्या प्रमोशनसाठी बिपाशा बसू हॉटेल फॉर्च्युन लँडमार्कमध्ये येणार आहे. ती फक्त पाच निवडक 'लकी' लोकांना आपली भेट व ऑटोग्राफ देणार आहे. त्या पाच लकी लोकांत मीही एक आहे. फक्त त्याकरिता मला एक फॉर्म भरून त्याच्याबरोबर टोकन मनी म्हणून एक हजार रुपयाचा डी. डी. आणायचा आहे. पत्र वाचून मला तर आकाशच ठेंगणं वाटू लागलं. आपल्या स्वतः:च्या भाग्याच्या अभिमान वाटू लागला. पंचवीश लक्ष लोकांमधून बिपाशा ज्या पाच लोकांना भेटणार आहे त्यात मी पण एक आहे ही भावना सुखावणारी होती.

बिपाशाची भेट, तिच्या बरोबर फोटोग्राफ, वर्तमानपत्रामध्ये पण फोटोसकट इंटरव्यू वा, काय मजा आहे. ऑफिसमध्ये माझे सहकारी माझ्याशी एरवी भांडत असतात, पण उद्या माझा बिपाशाबरोबर फोटो पेपरमध्ये आला तर ईर्ष्येने जळून अगदी काळेठिक्करच पडतील. मी पण विचार केला. 'जळा लेको जळा. मी तर बिपाशाला भटेणार हे नक्की.'

मला वाटलं हे स्वप्न तर नाही ना? खात्री करण्यासाठी मी स्वतः:ला चिमटा घेऊन पाहिला, पिन टोचून पाहिली पण हे सत्यच होतं.

आता मलाही तयारीला लागायलाच पाहिजे, म्हणून मी मित्राकडून पंधराशे रुपये उसने घेऊन एक रेडिमेट सूट विकत आणला. बायकोला तिच्या वाढदिवसानिमित्त साडी घेण्याकरिता दिलेले पाचशे रुपये पुन्हा मागून घेतले. साडी तर केव्हाही घेता येईल बायको कुठे जातेय. पण बिपाशाच्या भेटीचा योग तर कधी काळीच येतो ना.

महागाचा इम्पोर्टेड सेंट व परफ्यूम पण आणला. इतका सरंजाम झाल्यानंतर मी ठरल्या दिवशी वेळेच्या आधीच हॉटेलमध्ये गेलो. तिथे बरीच गर्दी होती. हॉटेलच्या मॅनेजरला मी आपलं पत्र दाखवल्याबरोबर त्याने मला लॉनमध्ये असलेल्या बागेत बसायला सांगितलं. तिथे माझ्यासारखे चार जण बसलेले होते. थोड्या वेळाने एजन्सीकडून पत्र आले होते. एक मनुष्य येऊन आमच्याकडून हजार रुपयाचा डी. डी. घेऊन गेला.

आम्ही बर्‍याच वेळापर्यंत उन्हामध्ये उपाशी वाट पाहत बसलो होतो. तिथे कोणी आम्हाला पाणीही विचारत नव्हता. दुपारी चार वाजता पोलिसांचा सायरन वाजवत एक गाडी आली व त्यामागून एका व्ही.आय.पी. गाडीमधून बिपाशा उतरली व हॉटेलमध्ये निघून गेली. आम्ही इतके लांब होतो की आम्हाला तिचा चेहरा पण दिसला नाही.

मी पुन्हा मॅनेजरला भेटलो, आपलं पत्र दाखवलं तो म्हणाला 'हा मिलवा देंगे, जल्दी क्यों करता हैं?' मी बराच वेळ वाट पाहत होतो. शेवटी पुन्हा मॅनेजरला भेटल्यावर तो चिडून म्हणाला - 'क्यो खालीपीली दिमाग खराब करता है, मॅडम का काम हो जाने पर फालतू लोगो से मिलने का समय बचा तो तुम्हे भी मिलवा देंगे'. बाहेर फारच गर्दी होती. आमचं कोणीच ऐकत नव्हत. वाट पाहता-पाहता संध्याकाळचे सात वाजून गेले. मग आम्हाला कळलं की बिपाशा बाहेर येतेय. तिला पाहण्याकरिता लोकांची गर्दी गेटकडे धावली.

गर्दीमध्ये पळापळ झाली होती, शेवटी पोलिसांनी गर्दी आवरण्याकरिता हलका लाठीचार्ज केला. लाठीचार्ज मध्ये पोलिसांचा एक दंडा माझ्या पाठीवर पण पडला. जमिनीवर पडल्यामुळे नवीन सूट फाटून गेला. हात खरचटले व जखम झाली. एक जोडा गर्दीमध्ये पायामधून निघून गेला. तेव्हाच कळले की बिपाशा हॉटेलच्या मागच्या गेटने केव्हाच निघून गेली आहे.

शेवटी फाटलेले कपडे, अनवाणी पायाने व खरचटलेले हात घेऊन कसाबसा रात्री दहा वाजता घरी पोहोचलो. मळकी साडी, सकाळपासून उपाशी व नवर्‍याच्या काळजीने अर्धी झालेली बायको माझी वाट बघत होती. मला पाहिल्याबरोबर तिच्या जीवात जीव आला ती म्हणाली 'भेट झाली का? बराच उशीर झाला.' मी नाही म्हटलं. बायकोने फाटका सूट अंगामधून काढला. हाताच्या जखमेला साडीने पुसून औषध लावून दिलं व पलंगावर झोपवून लगेच खायला बिस्किट व चहा करून आणला.

पोटामध्ये काही गेल्याने मला पण थोडी हुशारी आली होती. मी तिला दिवसभराची कहाणी सांगितली. माझी हकीकत ऐकून सुषमा मला म्हणाली - ''शशिकांत नवर्‍यावर साध्या मनाने व निष्पाप वृत्तीने प्रेम करणारी व त्याच्या काळजीमध्ये आपलं रक्त आटवणारी बायकोच त्याची खरी 'बिपाशा' असते.'

नेहमीच स्वप्नाच्या धुंदीत जगणार्‍या मला जीवनातील एक मोठं सत्य आज समजलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi