| 'मुलगी असेल तर घरात प्रेम, संस्काराचे वातावरण असते. आपली मुले देखील सुसंस्कारित होतील. घरात जर बहीण रूपाने मुलगी आली तर मुलेही मुलींचा सन्मान करतील' एवढे बोलून तिने माझे विचार मागितले.
|
|
|
लायंस क्लब- सुरभीच्या अध्यक्ष या नात्याने माझा सामाजिक कार्यात सहभाग पाहून नागरिक मला बऱ्यापैकी ओळखायला लागले होते. आठ मार्च रोजी क्लबने महिलांसाठी घेतलेल्या कार्यक्रमास प्रसारमाध्यमांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. त्याच सायंकाळी एका महिलेने मला फोन करून मला भेटायची इच्छा व्यक्त केली. ती महिला मला भेटली व तिचा परिचय देऊ लागली. ती चांगल्या घरची वाटत होती. तिला दोन मुले असून एक आठवीला असून दुसरा पाचवीत आहे. तिचे म्हणणे होते की, तिला एक मुलगी दत्तक घेण्यात क्लब व मी तिची मदत करावी. मी तिला उज्जैन येथील काही सामाजिक संस्थांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक दिले. यावर ती बोलली की, माझ्या पतीला तुम्ही समजवा ते मुलगी दत्तक घेण्याच्या विरुद्ध आहेत. मात्र मुलगी दत्तक घेण्याची तिची तीव्र इच्छा आहे.
हे पाहून मी बोलण्याच्या अगोदरच ती म्हणाली, 'मुलगी असेल तर घरात प्रेम, संस्काराचे वातावरण असते. आपली मुले देखील सुसंस्कारित होतील. घरात जर बहीण रूपाने मुलगी आली तर मुलेही मुलींचा सन्मान करतील' एवढे बोलून तिने माझे विचार मागितले.
त्यावर मी विचार करू लागले की, मुलींचा समाजात किती प्रभाव आहे मात्र मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण किती कमी आहे आणि याचा तर मी कधी विचार देखील केला नव्हता. यावरून आपल्या असे लक्षात येते की, मुलगी ही काळाची गरज झाली आहे त्यामुळे भ्रुण हत्येला विरोध झालाच पाहिजे.