Article Marathi Stories %e0%a4%af%e0%a4%b6 %e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%87 %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af %e0%a4%b0%e0%a5%87 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%8a 107042900001_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यश म्हणजे काय रे भाऊ?

यश व आनंदाचा शोध घेणारी कथा
टक.. टक.. टक.. दारावर वर्तमान पत्र टाकणारा मुलगा. सुरेशची साखर झोप अजूनही संपलेली नाही. झोपेतच ... वैताग! पोरग दारावरून हटायला तयार नाही. सुरेश नाराजीनेच बिछान्यातून उठून काय रे.. आ?

पोरग घाबरत, साहेब बील पायजे होत! सुरेशने पँटच्या खिशातून पैसे काढुन बील चुकत केल. सुरेशने पेपरवर नजर टाकली. पहिल्या पानावरिल बातम्या वाचून झाल्यावर थेट शहर पानावर.

स्वतच्या बातमी सोबत लगेच इतर रिर्पोटर्सनी केलेल्या बातमीची तुलना. जनरल बातम्या झाल्यावर मग विशेष बातम्या. झकास! .. महानगर पालिकेतील सुरशने काढलेली जमीन घोटाळ्याची बातमी पहिल्या पानावर.

तेही फक्त आपल्याच वर्तमान पत्रात. खास बातम्यांच्या बाबतीत शुरेशचा हातखंडा. शुरेशने अवघ्या तीन वर्षाच्या पत्रकरितेतील कारकीर्दीत आपले नेटवर्क तयार केले होते.

इतर रिर्पोटर्सना बातमीची कुणकूण लागायच्या अगोदर सुरेश बातमी छापुन तयार. वैताग झटकून आंघोळ उरकली. गाडीला जोरात किक मारली अन चाक गरागरा फिरायला लागली.

ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यनारायनाने भर सकाळी आग ओकायला सुरूवात केली होती. सुरेशला ऊन्हाचा मोठा वैताग. रिर्पोटरचे काम म्हटले की फिरणे आलेच.

सुरेशच्या मते पावसाळ्यात एकदाचा रेनकोट घालता येणार परंतू ऊन्हाच काय? दुपट्टा गुंडाळला तर केसांचा वैताग. नाही गुंडाळला तर ऊन लागण्याची भीती.

विचार चक्र सुरू असतांनाच गजुच्या टपरी समोर गाडीचे कचकन ब्रेक लागुन चाक फिरायची थांबली. गजु पानावर चुना लावता लावता नमस्कार सुरेश साहेब! सुरेश, नमस्कार.. आजच पान रंगायला पाहिजे.

रंगनार की साहेब. बातमी लय झकास आलीय म्हटल. गजु व सुरेश यांच्यात थोडावेळ त्यांच्या सांकेतीक भाषेत बोलचाल झाली अनं सरेशने गाडीची कीक मारताच चाके फिरायला लागली.

गाडीची चाकं ऑफिसच्या पार्कीगमध्ये थांबली अनं सुरेशने टेलिफोनचा ताबा घेतला. टेलिफोनची रिंग घरघरू लागली. कुठे, काय, कस, केव्हा, का? उरकले.

चमत्कार, नमस्कार झाले. मगं साहेब, आज यायचं काय? काय रामभाऊ साहेब काय म्हणतायत! इत्यादी संपलय. याला सुरेश राऊंड म्हणतोय.

सतर्क पत्रकारिता करायची झाल्यास किमान दोनदा राऊंड घ्यायलाच पाहिजे, हा सुरेशचा दंडक. ऋतु बदलले, वर्ष गेलीत पणं सुरेशची पत्रकारितेची बाराखडी बदलणार नाही.

पाचदहा फिडबॅकचे कॉल घेवून झाले. बातमी बद्दलच्या प्रतिक्रियाही आटोपल्या. बरेच ऊन पावसाळे निघून गेल्याने सुरेशला याचे रट्टे-घट्टे पडले होते. संपादक साहेबा सोबतची बैठक आटोपली.

तोपर्यत जेवणाचा डबा आला. न्याहारी उरकली. सुरेशने दैनदिन डायरीतील नोंदी डोळ्याखालुन घातल्या. काही टिपणं काढली. गाडीला कीक मारताच चाके फिरायला लागली. महानगरपालीकेच्या पार्कीगमध्ये चाके थांबली.

पत्रकारांच्या दालनात पोहचेपर्यत शंभरेक नमस्कार चमत्कार झाले. महापौर, आयूक्तांची भेट गाठ झाली. विरोधी पक्ष नेतेही भेटले. इतर पत्रकार मंडळीशी पत्रकार दालनात रोजच्या प्रमाणे मूक्त फटकेबाजी झाली.

सगळ्यांना बीट करून शहरातील प्रमुख घोटाळ्याची बातमी छापल्याने इंप्रेशन एकदम टाईट. परंतू सुरेश माणूस एकदम दिलदार मनाचा. बोलायला मनमोकळा. दोस्तांचा दोस्त. अभिजीतने मधातच पिलू सोडल, ' मग सुरेश आज कोठे बसायच?

सुरेश वैतागला. सालं बसनं, अनं फालतु चकाट्या मारत ढोसण, याचा त्याला आता वैताग यायला लागला होता. सुरूवातीला सुरेशलाही मजा यायची.

सुरेशचा आता राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या मातब्बर लोकांमध्ये बसन उठन होत. तीन वर्षाच्या अथक प्रयत्नातून त्याने स्वत:ला पत्रकारितेत प्रस्थापित केल होत.

नावं कमावल होत. शालेय जीवनापासून चालु ठेवलेल्या वाचनात त्याने आजही खंड पडू दिला नव्हता. त्यामुळे त्याला चांगली बैठक प्राप्त झाली होती.

महानगर पालिकेची विधायक कामे, भ्रष्टाचार व राजकीय गटबाजीचे विश्लेषणात्मक व शोध पत्रकारीतेचा पाया असणारे वार्ताकन तो करायचाच.

यासोबतच सांस्कृतिक प्रांतातील सर्जनशीलतेला वाव असणार लेखनही तो करायचा. सुरेश कलात्मक अभिरूची जोपासणारा माणूस. संगीत, नाटक, साहित्य यात त्यास विशेष रूची.

कलात्मक व दर्जेदार कलाकृतींचा त्याच्या संग्रहात समावेश नाही असं कधी झाल नाही. चौफेर वाचन, कलात्मकता जोपासणारा स्वभाव व आडव्या उभ्या क्षेत्रात असणारा त्याचा परिचय, मैत्री यातून त्याच्या व्यक्तीमत्वात परिपक्वता आली होती.

आपणं मिळविलेली पत, प्रतिष्ठा याला गालबोट लागु नये, यासाठी त्याने जपायला सुरूवात केली होती. अनंताने काय सुरेश कसला विचार करतोस यार? असे म्हणत खांद्यावर हात ठेवल्यावर त्याची विचारचक्र थांबली.

झपाझप पायर्‍या उतरून सुरेश पार्कीगमध्ये आला अनं गाडीला किक बसली. चाके गरागरा फिरायला लागली. ऑफिसमध्ये येवून त्याने कॉपी टाईप केल्या. बातमी सोडून थेट रूमवर. नुकत्याच गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेल्या होम थियटरवर त्याने मस्त जगजीत सिंग लावला.

गझलचे सुरेल, मंद स्वर वातावरणात पसरल्यावर स्लिपवेलच्या गादीवर पडून तो कॉलेजच्या आठवणीत रंगला. दररोजच्या वैतागापासून आज त्याला निवांत क्षण मिळाले होते.

तीन वर्षाअगोदर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व पत्रकारीता विभागात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत वर्तमान पत्रांच्या संपादकां सोबत संवाद साधण्याची संधी त्याला मिळाली होती.

विद्यार्थ्यामधून सुरेशने महाराष्ट्रातील राजकीय व सांस्कृतिक चळवळीवर केलेल्या विश्लेषणात्मक व तार्कीक कसोटीवर टिकणारया भाषणाने झालेला कौतुकाचा वर्षाव त्यास आजही आठवतो.

प्रचंड टाळ्यांचा कडकडाटात, 'सुरेश ग्रेट, एक्सलंट! हे विभाग प्रमुख व संपादकांचे शब्द आजही त्याला प्रेरणा देतात. कविता, सुधीर, प्रवीण, केतकी यांच्या घोळक्यात रमेशच्या कँटीनवर चहाचे फुरके मारतांना गरम, चुरचुरीत कांदा भजी खातांना केतकीने त्याला सार्वजनिकरित्या प्रपोज केले होते.

'आय लव्ह यू अँड वूड लाइक टू बी विथ टू फॉरएव्हर! या शब्दांनी सुरेश एकदम चाट पडला होता. मैत्री वगैरे ठीक पणं प्रेम वगैरे म्हणजे वैतागच, हे समीकरण त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेल होत.

सुरेश, सॉरी केतकी, अँट धीझ क्रुशीयल स्टेज आय हॅव नो टाइम फॉर लव्ह. माय फ्रस्ट प्रायऑरिटी इज जर्नालिझम! केतकी, सुरेश आय नो दॅट यूर आर टू पॅशनेट अबाउट जर्नालीझम.

बट डू नॉट कन्फ्यूज प्रोफेशन विथ पर्सनल लाइफ अँड एमोशन्स. वैताग. सुरेश वैतागला. आता प्रवीण, कविता व सुधीरही चालु होणार व यांना कनव्हींस करणे शक्य नाही हे त्याला माहिती होते.

सुरेश सरळ पार्कीगमध्ये अनं गाडीस जोरात किक. चाकांसोबतच विचार चक्रही गरागरा फिरायला लागली. वेताळ टेकडीच्या पायथ्याही ब्रेक लागताच चाके थांबली. टेकडीवर हवसे, नवसे, गवसे सर्वच फिरायला येत असतात.

प्रत्येकाच्या जागाही ठरलेल्या. सुरेश सर्व वैताग पार करून सर्वात उंच भागावर जावून बसला. संध्याकाळ झाली होती. आल्हाददायक हवा अंगाला स्पर्शून जात होती. संपूर्ण शहराचे मनमोहक दर्शन येथून व्हायचे.

सगळीकडे दिवे लागल्याने शहर प्रकाशात न्हावून निघाले होते. इतर वेळेस प्रचंड ट्रॅफिक व आवाज व पोलुशनमुळे वैताग देणारे रस्ते शांत, शिस्तबद्ध भासत होते. मिनमिनते दिवे घेवून गाड्या ये जा करीत होत्या.

वैताग घालविण्यासाठी सुरेशचे हे फेमस ठिकाण होते. येथे कोणीही फुकटचा सल्ला देणार नाही किवा शहाणपण शिकविणार नाही. डिस्टर्ब करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
क्रमश:

Share this Story:

Follow Webdunia marathi