Article Marathi Stories %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0 109022600037_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संस्कार

- प्रकाश दांडेकर

संस्कार
ND
सकाळी सहा वाजता रोजच्या नियमाप्रमाणे मी फिरायला व जॉगिंग करायला निघालो होतो. नुकताच अंधार संपून थोडा थोडा उजेड चहुकडे दिसू लागला होता. रात्री पडलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला थोडा चिखल झाला होता. मी आपलाच तंद्रीमध्ये हळू हळू धावत होतो अचानक रस्त्याच्या बाजूच्या चिखलावर माझा पाय घसरला आणि मी जमिनीवर सपशेल पालथा पडलो. त्याचवेळी मला काही मुलांचा कुत्सित हसण्याचा आवाज आला. मी कसाबसा उठायचा प्रयत्न करून पाहिला. हसणारी मुलं उच्चभ्रू घरातली आणि महागड्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये जाणारी होती. बसची वाट पाहत तिथे उभी होती. बहुतेक त्यांची बस यायला थोडा उशीर होता. तेवढ्यातच मी पडल्याने त्या रिकाम्या वेळात त्यांची विनासायस त्यांची करमणूक झाली. पडल्यामुळे शरीराला झालेल्या दुखापतीपेक्षा त्यांच्या कुत्सित हसण्याच्या अपमानाची जखम खोलवर झाली.

इतक्यात उष्ण वाळवंटात जणू गार वार्‍याची झुळुक यावी त्याप्रमाणे एक आवाज आला. ''काका तुम्ही कसे पडलात? तुम्हाला कुठे लागले तर नाही ना? थांबा मी तुम्हाला तुमच्या घरी सोडून येतो.'' मी वर पाहिलं, तर एक पेपर वाटणारा दहा वर्षाचा एक गरीब मुलगा मला पडलेले पाहून धावत आला होता. आपल्या छोट्या हातांनी मला उचलायचा प्रयत्न करत होता.

माझ्या तोंडामधून आपसूकच निघाले, 'बाळा, तुझं नाव काय काय? तू कोणत्या शाळेमध्ये शिकतोस?'

Share this Story:

Follow Webdunia marathi