एक पत्रकार वृद्धाश्रमात गेला. तिथे गेल्यावर त्याने एका वृद्धेला विचारलं, 'आजी, तुम्हाला किती मुलं आहेत?
ती म्हणते, 'मला मूल बाळ नसल्यामुळेच मी येथे आली आहे.'
पत्रकार म्हणतो, 'आपल्याला मुलगा नाही, याचं वाईट वाटत असेल ना तुम्हाला? मुलगा असता तर आता तुम्ही त्याच्याकडे मजेत रहात असता.'
वृद्धा उत्तर देण्याऐवजी एका वृद्धाकडे बोट दाखवते आणि सांगते, ती माझ्याहून जास्त दुःखी: आहे. कारण तिला तीन मुलं आहेत.
तो पत्रकार त्या वृद्धेच्या दिशेने जातो. त्यावेळी जवळ बसलेला आणखी एक वृद्ध त्याला थांबवत म्हणतो, 'या आश्रमात जेवढे लोक आहेत, त्या सर्वांना 2-5 मुलं आहेत, फक्त त्या ताईंना सोडून. पण आमच्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे.....
ती कोणती? पत्रकार उत्सुकतेने विचारतो.
आमच्यामध्ये कुणालाही मुलगी नाही आहे. मुलगी असती तर कदाचित आमच्यावर ही वेळ नसती आली आणि आम्ही तुम्हाला इथं दिसलो नसतो, तो वृद्ध उत्तरतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा