Article Marathi Stories %e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80 108082100003_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हुषारी

हुषारी
ND
एकदा राधिकाकाकू माळ्यावरचं गजपण काढत होत्या. काम करता करता त्यांनी पाहिलं तर एक बेडूक लाकडांच्या फटीत अडकून बसलेला दिसला. राधिकाकाकूंना पाहून करूण नजरेने तो बेडूक म्हणाला, 'तू मला या जाळ्यातून सोडवलंस तर मी तुझ्या तीन इच्छा पूर्ण करेल'.

काकूंनी होकार दिला आणि त्या बेडकाची सुटका केली. सुटका झाल्यानंतर बेडूक म्हणाला, बाई, मी तुला तुझ्या इच्छा पूर्ण करेन असं सांगितलं खरं. पण एक अट सांगायची विसरलो. तू जे काही मागशील ते तुला मिळेलच, पण तुझ्या नवर्‍याला मात्र दुप्पट मिळेल. एवढं लक्षात ठेव.'

काकूंनी मान डोलवून होकार दिला.

मग बेडकाने काकूंना पहिली इच्छा विचारली. त्यावर काकू म्हणाल्या, 'मला जगातील सगळ्यांत सुंदर स्त्री व्हायचं आहे.' लगेचच बेडकाने इशारा दिला, 'हे बघ, तू सुंदर होशील पण तुझा नवरा तुझ्यापेक्षा सुंदर होईल आणि मग त्याच्या मागे इतर बायकाही लागू शकतील. तेव्हा नीट विचार कर.'

काकू ठसक्यात म्हणाल्या, 'विचार करूनच सांगतेय. कारण त्याच्या मागे कितीही बायका लागल्या तरी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री मीच असेन. त्यामुळे तो मला सोडून कुठे जाणार नाही.'

बेडूक 'तथास्तू' म्हणाला. आणि त्याने दुसरी इच्छा विचारली. काकूंनी आपल्याला जगात सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती बनव असे सांगितले. बेडकाने पुन्हा इशारा दिला. 'तुझा नवरा तुझ्यापेक्षा श्रीमंत असेल.' काकू म्हणाल्या, 'काही हरकत नाही. शेवटी काय आम्ही नवरा बायको आहोत. त्यात आपलं तुपलं काय करायचं. त्याचं तेही माझंच नाही का?'

बेडूक 'तथास्तू' म्हणाला आणि त्याने त्यांची तिसरी इच्छा विचारली.

काकूंनी थोडा विचार केला आणि म्हणाल्या, 'मला ह्दयविकाराचा सौम्य धक्का येऊ दे.'

(ई-मेलवरूआलेल्यकथेचस्वैरूपांतर)

Share this Story:

Follow Webdunia marathi