Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गव्हाच्या पिठाचा गोड मालपुआ

गव्हाच्या पिठाचा गोड मालपुआ

वेबदुनिया

१ वाटी गव्हाचे पीठ, २ मोठे चमचे चण्याचे पीठ, अर्धी वाटी साखर, वेलची पूड, पिवळा खाण्याचा रंग (१ टीस्पून), चवीकरिता मीठ, शुद्ध किंवा वनस्पती तूप.

कृती : प्रथम गव्हाच्या पिठामध्ये चण्याचे पीठ एकत्र करावे. नंतर साखर व पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. मिश्रण दाटसर राहील इतकेच पाणी घालावे. त्यात मीठ, वेलची पूड, खाण्याचा रंग व थोडेसे मोहन म्हणून तूप घालून चांगले घोटावे. मंद आचेवर कढईत १ चमचा तूप घालून तापल्यावर १ डाव मिश्रण घालावे. थोडय़ा वेळाने झाऱ्याने उलटे करून मालपुआ दुसऱ्या बाजूने परतावा तसेच आवश्यकतेनुसार कडेने थोडे तूप सोडावे. अशा प्रकारे थोडे थोडे तूप घालूनच मालपुआ तयार करावा व सव्‍‌र्ह करतेवेळी कमी तिखट असलेली खोबऱ्याची चटणी सोबत द्यावी किंवा चटणी शिवायदेखील खाण्यास द्यावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'ऐलोवेरा'मुळे होणारे फायदे!