साहित्य: 3 वाट्या लाल भोपळ्याचा किस, 1 वाटी गूळ, एक चमचा जिरं, अर्धा चमचा मेथी दाणे, 1 वाटी खोवलेलं ओलं खोबरं, पाव लहान चमचा हळद, 1 चमचा तूप, स्वादानुसार मीठ, एक वाटी कणीक आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ, आवडीप्रमाणे खसखस, तळण्यासाठी तेल किंवा तूप
कृती:
एका कढईत तूप गरम करून त्यात भोपळ्याचा किस घालून वाफवून घ्या. मऊ शिजल्यावर गूळ घाला. मिश्रणाला उकळी आल्यावर गॅस बंद करुन त्यात मीठ घाला. मिश्रण कोमट झाल्यावर यात ओलं खोबरं, जिरं, मेथी दाणे आणि हळद याची मिक्सरमधे बारीकमध्ये वाटून घेतलेली पेस्ट घाला. मिसळून घ्या आणि मिश्रण गार होऊ द्या.
मिश्रण थंड झाल्यावर त्यात मावेल तितकं कणीक-तांदळाचं पीठ घाला. आता पुरीसाठी भिजवतो त्यासम पीठ घट्ट मळून घ्या. भोपाळा पाणी सोडतं त्यामुळे पाणी मुळीच वापरू नये.
आता पोळपाटावर खसखस पसरून मिश्रणाचे लहान गोळे घेऊन खसखशीवर थापून घ्या. कढईत तेल किंवा तूप गरम करून घारगे तळून घ्या.