Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Christmas special recipe Plum cake ख्रिसमस फ्रूट केक

Plum cake
, गुरूवार, 11 डिसेंबर 2025 (08:00 IST)
साहित्य-
सुके मेवे
मनुका -१/२ कप
काळ्या मनुका -१/४ कप
टूटी-फ्रूटी- १/४ कप
चेरी -१/४ कप
बदाम आणि काजू तुकडे -१/२ कप
मैदा-१ १/२ कप
ब्राउन शुगर-१ कप
बटर/लोणी-१/२ कप
अंडी-२
दूध-१/४ कप
संतऱ्याचा रस-१/४ कप
व्हॅनिला इसेन्स -१ चमचा
दालचिनी पावडर-१ चमचा
जायफळ पावडर-१/२ चमचा
बेकिंग पावडर -१ चमचा
बेकिंग सोडा-१/२ चमचा
ALSO READ: Christmas special : या रेसिपी नक्की बनवा
कृती-
सर्वात आधी किमान १ तास किंवा रात्रभर संत्र्याचा रस आणि सुके मेवे भिजवून ठेवा. आता मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मसाले एकत्र चाळून घ्या. एका मोठ्या भांड्यात बटर आणि साखर फेणून घ्या. नंतर एकेक करून अंडी घाला आणि चांगले मिक्स करा. व्हॅनिला इसेन्स घाला. आता हळू हळू मैदा आणि दूधाचे मिश्रण आलटून पालटून घाला आणि मिश्रण हलक्या हाताने मिक्स करा. आता भिजवलेले सुके मेवे आणि त्यांचे उर्वरित द्रव बॅटरमध्ये मिसळा. केकच्या भांड्याला बटर लावून मैदा भुरभुरा. तयार मिश्रण भांड्यात ओता. ओव्हनमध्ये १८०°C वर ४५ ते ५० मिनिटे बेक करा. तयार केक वर लाल चेरी सजवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: काही मिनिटात तयार होणारी कप केक रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Christmas Special Recipe: चॉकलेट केक

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी