Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

Sweet Recipe : खजूर बर्फी

burfi
, गुरूवार, 23 जानेवारी 2025 (08:00 IST)
साहित्य-
खजूर - 500 ग्रॅम  
दूध - 1 कप
तूप - चमचे दोन
सुकामेवा - 50 ग्रॅम सुकामेवा
वेलची पावडर - 1/4 टीस्पून
नारळ किसलेले - दोन टेबलस्पून
ALSO READ: आरोग्यवर्धक आवळ्याचा च्यवनप्राश रेसिपी
कृती-
सर्वात आधी खजूर स्वच्छ धुवून घ्यावे. तसेच त्यामधील बिया काढून टाकाव्या. यानंतर त्याचे लहान तुकडे करा. आता चिरलेल्या खजूर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा. जर पेस्ट जाड असेल तर त्यात थोडे अधिक दूध घाला. नंतर एका पॅनमध्ये तूप गरम करावे. आता त्यात खजूराची पेस्ट घाला आणि सतत ढवळत मंद आचेवर चांगले शिजवा. नंतर पेस्ट घट्ट होऊ लागली की त्यात बारीक चिरलेली सुकी मेवे आणि वेलची पावडर आणि नारळाचा किस घालवा. यानंतर, मिश्रण घट्ट होऊन पूर्णपणे सेट झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढा आणि चमच्याने पसरवा. आता थंड होऊ द्या. तुमच्या आवडीनुसार वड्या कापून घ्या. तर चला तयार आहे आपली खजुराची बर्फी रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Birthday Wishes For Father In Marathi वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी