Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

चविष्ट पनीरचे लाडू -

delicious Paneer Recipe
, शनिवार, 13 मार्च 2021 (17:47 IST)
आपण देखील गोड खाण्याची आवड ठेवता, तर घरात झटपट बनणारे पनीर चे लाडू करून बघा. आपल्याला हे नक्कीच आवडेल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
साहित्य- 
300 ग्रॅम पनीर,2 चमचे नारळाचा किस,1 वाटी साखर,1/2 चमचा  वेलची पूड,1/2 चमचा मिल्क पाऊडर,2 चमचे सुकेमेवे, 1/2 चमचा साजूक तूप.
 
कृती -
पनीर मिक्सर मध्ये दरीदरीत वाटून घ्या. आणि एका भांड्यात काढून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करून मध्यम गॅस वर पनीर घालून काही वेळ परतून घ्या. या मध्ये वेलची पूड आणि साखर देखील मिसळा आणि चांगले ढवळून पाच मिनिटे परतून गॅस बंद करा. या मध्ये सुकेमेवे बारीक करून नारळाचा किस मिसळा थंड करून लाडू बनवा. पनीरचे लाडू खाण्यासाठी तयार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

UPSC Recruitment 2021 : ऑफिसर्स पदांवर भरती