ज्यांना काही न काही दररोज गोडधोड खाण्यासाठी सवय असते त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत चविष्ट पनीरची खीर बनवायची रेसिपी. हे आपण कमी वेळात चटकन बनवू शकता आणि डेझर्टच्या स्वरूपात याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग पनीरची खीर बनवायची रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य -
अर्धा लीटर दूध, 100 ग्रॅम पनीर, वेलचीपूड, 50 ग्रॅम साखर, काजू, बदाम, चारोळ्या, बेदाणे किंवा किशमिश, केसर.
कृती -
एका भांड्यात दूध उकळवून घ्या. चांगली उकळी आल्यावर गॅस कमी करा. आता यामध्ये किसलेले पनीर घाला. चांगल्या प्रकारे ढवळून शिजवून घ्या. दूध घट्ट झाल्यावर साखर मिसळा. आपण आपल्या चवीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. दुधाला ढवळत राहा. जेणे करून तळाला लागू नये. या मध्ये किशमिश, केसर, वेलची पूड,काजू, बदाम घाला आणि मिसळून घ्या. गरम किंवा थंडी आवडीप्रमाणे पनीरची खीर सर्व्ह करा.