हिवाळ्यात सुंठाचे लाडू खाणे आरोग्यासाठी खूप फायद्याचे असल्याचे सांगितले जाते. चला तर मग जाणून घेऊया सुंठाचे लाडू कसे बनवतात-
सुंठाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य- १५० ग्रॅम बारीक सुंठ पूड, ६०० ग्रॅम गव्हाचे थोडे जाड पीठ, १५० ग्रॅम बारीक केलेला खाण्याचा डिंक, १०० ग्रॅम खसखस, २५० ग्रॅम ड्रायफ्रूट्सचे काप, ५० ग्रॅम बारीक मेथीदाणा, १०० ग्रॅम वेलदोडा पावडर, १०० ग्रॅम बारीक केलेली खारिक, १ किलो गुळ, २५० ग्रॅम पीठी साखर, शुद्ध तूप गरजेनुसार.
कृती : सुंठाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढाई मध्ये तूप टाकून ते गरम करा व त्यात बारीक केलेला खाण्याचा डिंक परतवून घ्या. आता खसखस टाकून हलकं परतवून काढून घ्या. परत त्याच कढईत तूप टाकून मेथीदाने परतवून वेगळे काढून घ्या. आता परत त्याच कढईत दोन मोठे चमचे तूप टाकून गव्हाचे पीठ भाजून घ्या. छान हल्कासा गुलाबी रंग आल्यावर त्यात सुंठ पूड टाकून परतवून घ्या. गरज असेल तर थोडे थोडे तूप टाकून परतवत रहा. कढईतील मिश्रणाचा कलर ब्राउन झाल्यावर गॅस वरून ख़ाली उतरवून घ्या.
आता कढईत तूप टाकून त्यात बारीक केलेला गूळ घाला व परतवून घ्या मग गूळ आणि तूप छान मिक्स झाले की गॅस वरून खाली उतरवून घ्या आता पूर्ण मिश्रण त्यात टाकून द्या. मेवा काप, बारीक साखर आणि वेलदोडा पूड टाकून मिश्रण एकजीव करून थोडे कोमट झाले की लाडू बनवा.
चला तर मग तयार आहे आपले चविष्ट आणि पौष्टिक सुंठाचे लाडू. हिवाळ्यात दिवसातून एकदा ह्या एका लाडूच्या सेवनाने शरीरात उष्णता राहील आणि सोबत अनेक रोगांशी लढायची ताकत पण मिळेल.