Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gajar halvaa Recipe : माव्याशिवाय गाजराचा हलवा कसा बनवाल, रेसिपी जाणून घ्या

webdunia
, मंगळवार, 3 जानेवारी 2023 (18:42 IST)
हिवाळ्यात गाजराचा हलवा खाण्याची मज्जाच काही वेगळीच आहे. जर तुम्हाला हिवाळ्यात गरमागरम गाजराचा हलवा खायला मिळत असेल तर यापेक्षा चविष्ट अजून काय असू शकतं. गाजराचा हलवा खाण्यास अतिशय चविष्ट असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक असतो. तुम्ही घरीही गाजराचा हलवा सहज बनवू शकता. गाजराचा हलवा अनेक प्रकारे बनवला जातो, काही लोक माव्यापासून गाजराचा हलवा बनवतात, तर काही लोक माव्याशिवाय गाजराचा हलवा फक्त दुधाने बनवतात. बाजारातील मिळणाऱ्या माव्यासोबत गाजराचा हलवा खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला माव्याशिवाय गाजराचा हलवा कसा बनवायचा हे सांगत आहोत. बाजारातील गाजर हलव्यापेक्षा हा हलवा चवीला चांगला लागतो. चला तर मग रेसिपी जाणून घ्या.
 
गाजर हलव्यासाठी साहित्य
गाजर 1 किलो
दूध फुल क्रीम 1 1/2 लिटर
साखर 250 ग्रॅम
चिरलेले काजू, चिरलेले बदाम, 
मनुका प्रत्येकी 10 
पिस्ता चिरलेला 
वेलची पावडर अर्धा टीस्पून
तूप 1 टेस्पून
 
गारज हलवा रेसिपी
प्रथम गाजर सोलून किसून घ्या.
आता गाजर आणि 1 कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये 1 शिट्टी येईपर्यंत शिजवा.
कुकर उघडल्यावर गाजरातील सर्व पाणी काढून टाका.
मध्यम आचेवर कढईत तूप टाकून गरम करायला ठेवा.
आता कढईत तूप गरम करून त्यात गाजराचे मिश्रण शिजवून घ्या.
आता त्यात दूध घालून ढवळत असताना दूध घट्ट होईपर्यंत शिजवा.
सर्व दूध सुकल्यावर गाजरात साखर घालून मिक्स करा.
साखरेचे पाणी सुकल्यावर त्यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा.
गाजर, दूध आणि साखरेचे पाणी सुकले की हलवा तयार आहे. 
गरमागरम स्वादिष्ट गाजर हलवा सर्व्ह करा.

Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Cabbage pickle कोबी-मटराचं लोणचं