Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ganesh Chaturthi Special Motichoor Laddoo Recipe: गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी घरीच मोतीचूर लाडू तयार करा रेसिपी जाणून घ्या

Ganesh Chaturthi Special Motichoor Laddoo Recipe: गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी घरीच मोतीचूर लाडू तयार करा रेसिपी जाणून घ्या
, शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (15:34 IST)
Motichoor Laddoo Recipe: गणेश चतुर्थीचा सण जवळ आला आहे. गणपतीची मूर्ती घरोघरी आणण्यासाठी भक्तांनी आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे.पूजेच्या साहित्यापासून ते मंदिराच्या आरास पर्यंत विशेष तयारी केली जात आहे. पण या सगळ्यांसोबत बाप्पाला प्रसन्न करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे दररोजचा नेवेद्य. मोदकासह बाप्पाला मोतीचूरचे लाडू खूप आवडतात.गणपती बाप्पा साठी घरातच मोतीचूरचे लाडू तयार करा. चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य-
दोनशे ग्रॅम बेसन, पिवळा फूड कलर, तीन मोठे चमचे साजूक तूप, साखर चारशे ग्रॅम, गुलाबपाणी किंवा केवरा पाणी, लिंबाचा रस, पिस्ते बारीक चिरलेले, तेल.
 
कृती -
मोतीचूर लाडू बनवण्यासाठी बेसन चाळून एका भांड्यात ठेवा. बेसनामध्ये थोडा फूड कलर घाला. तसेच एक चमचा साजूक तूप घालून मिक्स करा.आता बेसनामध्ये पाणी घालून द्रावण तयार करा. हे द्रावण खूप पातळ किंवा जास्त जाड नसावे हे लक्षात ठेवा. बेसनाचे घोळ असे असावे की ते चमच्यावर घेतल्यास ते सहज खाली पडले पाहिजे. 
 
आता कढई गॅसवर ठेवा आणि तळण्यासाठी त्यात तेल घाला. तेल थोडे तापायला लागल्यावर गॅस कमी करा. आता कढईवर छोटे छिद्र असलेली चाळणी घ्या. ज्याने बुंदीचा आकार लहान होतो. आता या चाळणीवर बेसनाचे मिश्रण ओतावे. चाळणीतून गाळून हे द्रावण गोल आकारात तेलात पडेल. सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. या प्रक्रियेने सर्व बुंदी तयार करा. सर्व बुंदी तयार झाल्यावर त्यावर साचलेले जास्तीचे तेल हाताच्या सहाय्याने पिळून काढावे. जेणेकरून पाकात घातल्यावर बुंदीतील तेल वेगळे होणार नाही. 
 
आता साखरेचा पाक तयार करा
साखरेचा पाक बनवण्यासाठी पॅनमध्ये 400 ग्रॅम साखर घाला. थोडे पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा. पाक घट्ट व्हायला लागल्यावर त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. लिंबाच्या रसामुळे लाडूंना साखर चिकटत नाही. तसेच या पाकात केवराचे पाणी किंवा गुलाबपाणी टाका. पाक घट्ट व्हायला लागल्यावर गॅस बंद करून भांडे गॅसवरून काढा. 
 
आता या पाकात बुंदी मिक्स करून झाकून ठेवा. जेव्हा ते थंड होऊन हाताने स्पर्श करता येईल तेव्हा हे बुंदीचे लाडू तयार करा. वर चिरलेला पिस्ता लावा. स्वादिष्ट मोतीचूर लाडू नेवेद्यासाठी तयार आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Certificate Course in Retail Management After 12th : रिटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा कोर्स म्हणजे काय? अभ्यासक्रम, पात्रता आणि व्याप्ती जाणून घ्या