साहित्य-
आळीव -२ मोठे चमचे
दूध-४०० मिली
गूळ किंवा साखर चवीनुसार
नारळाचे दूध -१०० मिली
वेलची पूड -१/४ लहान चमचा
तूप-१ लहान चमचा
सुका मेवा गरजेनुसार
पाणी-१/२ कप
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात आळीव घ्या आणि त्यात पाणी घालून किमान ३ ते ४ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. भिजल्यावर आळीव जेलीसारखे होतात आणि त्यांचे प्रमाण वाढते. आता एका जाड भांड्यात तूप गरम करा. नंतर त्यात भिजवलेले आळीव घाला आणि १-२ मिनिटे परतून घ्या. आता त्यात दूध घाला आणि मध्यम आचेवर ढवळत रहा. दूध उकळू लागले आणि थोडे दाट झाल्यावर गॅस मंद करा. आता गॅस बंद करा. खीर थोडी कोमट झाल्यावर त्यात चवीनुसार गूळ किंवा साखर घाला. आता त्यात वेलची पूड घाला. खीर अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनवण्यासाठी या टप्प्यावर तुम्ही नारळाचे दूध घालू शकता. तयार खीर मध्ये वरतून काजू, बदाम किंवा पिस्त्याचे तुकडे घालून सजावट करा. तर चला तयार आहे आपली हिवाळा विशेष आळिवाची खीर रेसिपी, गरम किंवा थंड नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik