Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खोबऱ्याची खिरापत

Ganesh chaturthi
, सोमवार, 22 जानेवारी 2024 (09:00 IST)
साहित्य : अर्धा वाटी किसलेले सुके खोबरे
1 चमचा खसखस
150 ग्रॅम खडीसाखर किंवा साखर बुरा
एक लहान चमचा वेलची पूड
5 खारकांची पूड
10 बदाम बारीक कापून
 
कृती :
किसलेले सुके खोबरे मंद आचेवर भाजून घ्यावं. भाजलेले खोबरे ताटात काढावं. मग मंद आचेवर खसखस भाजून घ्यावी. त्यात कापलेले बदाम किंवा आपल्या आवडीप्रमाणे बदामाची पूड आणि खारकांची पूड मध्यम आचेवर भाजून घ्यावी. आता भाजलेले खोबरे, खसखस, बदाम-खारकांची पूड, साखर आणि वेलची पूड एकत्र करून भरडसर खिरापत तयार करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फक्त 7 रुपयांत वाचणार हृदयरुग्णांचे प्राण, 'Ram Kit' ठरणार वरदान