पावसाळ्यात काही चमचमीत,तळकट खावंसं वाटते.एकाद्या दुकानावर जाऊन गरम समोसे,कचोडी,भजी,जिलेबी खाण्याचा मोह आवरला जात नाही.सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाहेर कुठे ही जाऊन खाणे धोकादायक असू शकतं.काही गोड खावंसं वाटले की आपण घरच्या घरात मक्याच्या कणसाचा हलवा देखील बनवू शकता.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य -
1 वाटी मक्याच्या कणसाचे ताजे दाणे,100 ग्रॅम ताजा खवा,100 ग्रॅम नारळाचं किस,100 ग्रॅम साजूक तूप,25 ग्रॅम बदामाची तुकडी,वेलची पूड,चिमूटभर खाण्याचा रंग,150 ग्रॅम पिठी साखर.
सजावटीसाठी -काजू,आणि नारळाचे काप,बदाम,
कृती-
सर्वप्रथम मक्याच्या कणसाचे दाणे काढून मिक्सरमध्ये दरीदरीत वाटून घ्या.कढईत तूप गरम करून वाटलेले दरीदरीत दाणे मंद आचेवर भाजून घ्या.
या मिश्रणातून तीक्ष्ण वास आल्यावर त्यात खवा मिसळा आणि 5 मिनिटे परतून घ्या. पिठी साखर मिसळून 2 वाटी पाणी घालून 10 ते 15 मिनिट मंद आचेवर शिजू द्या.पाणी कोरडे झाल्यावर त्यात गोड रंग आणि सुकेमेवचे बारीक तुकडे घाला.
आता वेलची पूड आणि बदामाचे तुकडे,काजू,नारळाच्या किस घालून सजावट करा आणि हलवा खाण्यासाठी सर्व्ह करा.हा मक्याच्या कणसाचा हलवा चविष्ट असण्यासह पौष्टिक देखील आहे.