बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई, आहारातील फायबर, प्रथिने, रिबोफ्लेविन, मॅंगनीज, फोलेट यांसारख्या 15 पोषक तत्वांचा स्त्रोत असल्याने बदाम हे उत्तम आरोग्याचे वरदान मानले जाते. नियमितपणे बदाम खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य, मधुमेह, त्वचेचे आरोग्य आणि वजन व्यवस्थापन यासह अनेक फायदे होतात. बदाम भिजवून खाऊ शकतात किंवा त्याची खीरही बनवता येते. आज आम्ही आपल्याला बदाम लाडूची रेसिपी सांगणार आहोत. हे लाडू आपण बदाम, गूळ आणि मनुका घालून बनवू शकता. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊया-
साहित्य -
1 कप बदाम , 1 कप किशमिश(बेदाणे ), 1 /2 वाटी गूळ, वेलचीपूड,
कृती-
सर्व प्रथम एक पॅन गरम करा. नंतर एक कप कच्चे बदाम मंद किंवा मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत चांगले परतून घ्या . त्यात बेदाणे मिक्स करा. गॅस बंद करा आणि एका भांड्यात भाजलेले बदाम आणि बेदाणे काढा. आता या दोन्ही गोष्टी मिक्सरमध्ये नीट वाटून घ्या. तसेच त्यात वेलचीपूड ,गूळ घाला. आता मिक्सर मध्ये वाटून घ्या. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढा.
कसे बनवावे
तळहातावर थोडं तूप लावून हातात या मिश्रणाचे छोटे छोटे भाग घ्या आणि मग लाडूचा आकार द्या. त्याचप्रमाणे सर्व मिश्रणाने बदामाचे लाडू बनवा. लाडू तयार आहेत.
टिप्स -
* बदाम भाजताना ते ढवळत राहा. बदाम जाळू नका.
* बदाम मायक्रोवेव्हमध्येही भाजता येतात.