Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

होळी स्पेशल : पुरण पोळी

होळी स्पेशल : पुरण पोळी
महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनात पुरणपोळीचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुरणपोळी करण्याची पद्धत प्रांतानुसार बदलते. विदर्भातील पोळी पुरणाने ठासून भरलेली, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुरणाचा भरणा कमी असलेली. पुरणाची गोडी थेट सात समुद्रापार करून युरोप अमेरिकेतही पोहचली आहे.

साहित्य - एक किलो हरभर्‍याची डाळ, दोन किलो साखर, चांगल्या प्रतीच्या गव्हाची कणिक, 20 ग्रॅम इलायची, 250 ग्रॅम साजूक तूप.

कृती : हरभर्‍याची डाळ स्वच्छ पाण्याने धूऊन घ्यावी. गॅसवर 4 लिटर पाणी अल्युमिनियमच्या पातेल्यांत तापायला ठेवावे. पाणी तापल्यानंतर त्यात डाळ घालावी.

गॅसचा जाळ साधारण ठेवावा. डाळ शिजायला आल्यावर तिला तांबूस रंग प्राप्त होतो. सुगंधही दरवळू लागतो. डाळ शिजल्यावर त्यात साखर, बारीक वाटलेली इलायची पावडर घालावी. मिश्रण चमच्याने चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. तयार मिश्रण पुरणवाटप यंत्रातून काढून घ्यावे. चांगली मळलेली कणिक आणखी एकदा तुंबून घ्यावी.

कणकेची हाताच्या तळव्यावर पातळ चपाती करून त्यात समप्रमाणात पुरण भरावे. पुरण भरून झाल्यावर पोळपाटावर हळूवारपणे लाटावे. ठासून पुरण भरलेली पोळी लाटल्यावर अलगद तव्यावर टाकावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त: स्पर्धा परिक्षांचे अभ्यासतंत्र