Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rice Kheer recipe : या पितृपक्षात स्वादिष्ट तांदळाची खीर बनवा, रेसिपी जाणून घ्या

Rice Kheer recipe :  या पितृपक्षात स्वादिष्ट तांदळाची खीर बनवा, रेसिपी जाणून घ्या
, शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (15:35 IST)
Rice Kheer recipe : भारतीय सणांमध्ये खीर महत्त्वाची भूमिका बजावते. शरद पौर्णिमा, वाढदिवस, भंडारा, असो खीर बनवतात. सध्या पितृपक्ष सुरु आहे. पितृपक्षात तांदळाची खीर बनवतात. आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी तांदळाची खीर आणि भरडाचे वडे केले जातात. चला तर मग तांदळाची चविष्ट खीर बनवण्याची कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य -
दूध - 1 लिटर
तांदूळ - 150 ग्रॅम
साखर - 100 ग्रॅम
सुखेमेवे -काजू, बदाम, मनुका
वेलची -4 
 
कृती- 
तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ एक तास भिजवून ठेवा. आता एका भांड्यात दूध घालून उकळवून घ्या. नंतर दूध उकळव्यावर त्यात भिजत घातलेले तांदूळ घाला आणि 20 मिनिटे शिजवा. नंतर वेलची आणि साखर घालून 15 मिनिटे उकळवून घ्या. नंतर त्यात सुकेमेवे घालून 10 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. मधून मधून ढवळत राहा. स्वादिष्ट तांदळाची खीर खाण्यासाठी तयार आहे. 
 
 



Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in Master of Surgery Obstetrics and Gynaecology :मास्टर ऑफ सर्जरी ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या