साहित्य : 1/2 किलो मँगोपल्प, 1/2 मावा, 1/2 किलो साखर, थोडी पिठीसाखर, वेलदोडे पूड, चारोळी, पिस्ते काप, वर्ख.
कृती : 200 ग्रॅम साखर व पल्प घालून आटवून अर्ध करा. मावा किसून वेगळा भाजा, उरलेली साखर घालून भाजा. दोन्ही मिश्रणं एकत्र करून हवा असल्यास केशरी रंग, वेलदोडे पूड घाला. कोमट झाल्यावर थोडी पिठीसाखर घाला. ट्रेमध्ये थापून वर वर्ख लावा. चारोळी, पिस्त्याने सजवा. थंड झाल्यावर बर्फी थापा.