साहित्य : 500 ग्रॅम आंबे, 250 ग्रॅम मैदा, 100 ग्रॅम खवा, 300 ग्रॅम साखर, केशर, विलायची पूड, तळण्यासाठी तूप.
कृती : आंब्यांची सालं काढून त्याच्या फोडी करून मिक्सरमधून रस काढून घ्यावा. त्यात मैदा व खवा टाकून एकजीव करावे. साखरेचा पाक करून घ्यावा. त्यात केशर व वेलची पूड टाकावी. फ्राइंग पॅनमध्ये तूप गरम करून त्यात तयार केलेला घोळ चमच्याने थोडा-थोडा टाकावा. गुलाबी होईस्तोर ते भजे तळावे. तळून झाल्यावर चाशनीत टाकावे व गरम गरम सर्व्ह करावे.