Article Marathi Sweet Dishes %e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%97 109030900067_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंब्याचे पुडींग

आंबे
ND
साहित्य : 3 आंबे, 1/2 लीटर दूध, 1 पॅकेट स्ट्रॉबेरी इसेन्स (लहान), कस्टर्ड पावडर 2-3 चमचे, 1/2 कप साखर, बदाम, काजू, पिस्ता, चेरी.

कृती : प्रथम आंब्याची साले काढून बारीक तुकडे चिरा व साधारण हलक्या हाताने एकदाच कुस्करून ठेवा. दुधात साखर, स्ट्रॉबेरी इसेन्स व कस्टर्ड पावडर टाकून चांगले चोपडे करा व गॅसवर मिश्रणाचे भांडे ठेवून ढवळून दाट करा. गुठळ्या होऊ देऊ नका. मिश्रण थंड झाल्यावर त्यात आंब्याचा गर घालून हलक्या हाताने ढवळा. सर्व सुका मेवा व चेरी टाकून मिसळून भांडे फ्रीजमध्ये ठेवा व चांगले सेट झाल्यावर पुडींग काचेच्या बाऊलमध्ये टाकून सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi