Article Marathi Sweet Dishes %e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a5%80 110082500008_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपवासाची खांडवी

उपवासाची खांडवी गूळ
MHNEWS
साहित्य : दोन वाटय़ा वरीचे तांदूळ, तीन वाटय़ा गूळ, एक वाटी नारळाचा चव, छोटा आल्याचा तुकडा, चिमूटभर मिठ, चिमूटभर केशर, अर्धी वाटी तूप, खांडवी सजावटीसाठी काजू, बदाम चारोळ्या याचाही उपयोग करता येतो.

कृती : प्रथम वरीचे तांदूळ कोरडे भाजून घ्यावे. स्वच्छ धुवून घ्यावेत. तूप गरम करून त्यात टाकावे. आले, नारळाचा चव वाटून तो शिजवायला ठेवावा. त्यात चिमूटभर मिठ, वेलदोडा, केशर टाकावे. वरीचे तांदूळ शिजल्यावर ते परातीत मोकळे करून पसरवून ठेवावे. गुळाचा पाक करून त्यात एक चमचा तूप घालावे. त्यात मोकळे केलेले तांदूळ घालून ते परतून घ्यावे. घट्ट झाले की, तूप लावून त्यावर तो गोळा करून थापावा. जाड वडय़ा पाडाव्यात. सजावटीसाठी काजू, चारोळ्या, बदामाचे काप लावून सजवावेत. गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून त्यावर थापल्या तरी छान दिसतात. आणि लागतातही चवदार.

Share this Story:

Follow Webdunia marathi