Article Marathi Sweet Dishes %e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b0 %e0%a4%86%e0%a4%87%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae 108031400017_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केशर आइसक्रीम

केशर आइसक्रीम
ND
लागणारे जिन्नस:
3 लीटर दूध, एक मोठा चमचा केशर, 6 मोठे चमचे साखर, 100 ग्रॅम ड्रायफ्रूटचे काप, 2 मोठे चमचे कस्टर्ड पावडर, 3 कप क्रीम, 5 ग्रॅम वेलची पूड, दोन-तीन थेंब केशरी रंग, इच्छेनुसार सुगंध.

करावयाची कृती:
थोड्या दुधात कस्टर्ड पावडर आणि साखर विरघळवून घ्या. बाकी दुध उकळायला ठेवा, दूध उकळून अर्धे झाले की तयार केलेले कस्टर्ड टाकून दुधात सोडून द्या. दोन मिनिटे उकळवून गॅसवरून उतरवून घ्या. थोडे थंड झाल्यावर क्रीम, वेलची पूड, इसेंस, अर्धा केशर, अर्धा ड्रायफ्रूटचे काप व्यवस्थित फेटून घ्या. थंड झाल्यावर हे मिश्रण आइसक्रीम जमवायच्या भांड्यात टाकून फ्रीजरमध्ये ठेवून द्या. पंधरा मिनिटांनी काढून व्यवस्थित फेटून घ्या. असे दोन ते तीन वेळा करा.

त्यामुळे आइसक्रीममध्ये बर्फ होणार नाही. आइसक्रीम अर्धे जमल्यावर राहिलेले ड्रायफ्रूटचे काप आणि केसर टाका. परत जमण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi