साहित्य :- १० ते १२ खजुर (बिया काढुन) १५ ते २० बदम बिया १५ ते २० काजु बिया २ ते ३ टीस्पून खसखस भाजुन ४ ते ५ टीस्पून खोबरे भाजुन आणि चुरुन २ ते ३ चमचे साखर (ही घातली नाहि तरी चालते).
कृती - बदाम, काजुची भरड पुड करुन घ्यावी. खसखस भाजुन त्याची पाण बारीक पुड करुन घ्यावी. खोबरे गुलबट रंगावर भाजुन चुरुन घ्यावे. फूडप्रोसेसर मधे बिया काढलेला खजुर मध्यम बारीक करुन घ्यावा. त्या बदाम काजुची पूड, खसखस पूड, चुरलेले खोबरे आणि घालणार असाल तर साखर घालुन एकदा फूडप्रोसेसर मधुन फ़िरवुन काढावे. तुपाचा हात लावुन अल्युमिनिअमच्या फॉईलवर मिश्रणाचा रोल करावा. त्याचे १ ईंच लांबीचे तुकडे करावेत. हे रोल सहज ८ ते १० दिवस टिकतात.
कृती - हे रोल अजुन पौष्टीक करायचे असतील तर अक्रोड, पिस्ते वगैरे पण घालु शकता. किंवा दूधमसाल्यात बारीक केलेला खजुर घालुन पण झटपट रोल होऊ शकतात.