१ वाटी गव्हाचे पीठ, २ मोठे चमचे चण्याचे पीठ, अर्धी वाटी साखर, वेलची पूड, पिवळा खाण्याचा रंग (१ टीस्पून), चवीकरिता मीठ, शुद्ध किंवा वनस्पती तूप.
कृती : प्रथम गव्हाच्या पिठामध्ये चण्याचे पीठ एकत्र करावे. नंतर साखर व पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. मिश्रण दाटसर राहील इतकेच पाणी घालावे. त्यात मीठ, वेलची पूड, खाण्याचा रंग व थोडेसे मोहन म्हणून तूप घालून चांगले घोटावे. मंद आचेवर कढईत १ चमचा तूप घालून तापल्यावर १ डाव मिश्रण घालावे. थोडय़ा वेळाने झाऱ्याने उलटे करून मालपुआ दुसऱ्या बाजूने परतावा तसेच आवश्यकतेनुसार कडेने थोडे तूप सोडावे. अशा प्रकारे थोडे थोडे तूप घालूनच मालपुआ तयार करावा व सव्र्ह करतेवेळी कमी तिखट असलेली खोबऱ्याची चटणी सोबत द्यावी किंवा चटणी शिवायदेखील खाण्यास द्यावे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा