साहित्य : गव्हाचे पीठ चार वाट्या, तूप एक वाटी, गूळ दोन वाट्या, वेलदोडे.
कृती : गव्हाचे पीठ तुपावर तांबूस भाजून घ्यावे. गुळाचा दोन-तारी पाक करून, त्यात भाजून घेतलेले गव्हाचे पीठ घालून, वर वेलचीची पूड घालावी व चांगले ढवळावे. लगेच ताटाला तुपाचा हात लावून ते मिश्रण त्यावर घालून सारखे पसरावे. सारखे झाल्यावर वड्या पाडाव्यात.