घावन : सर्वप्रथम तांदळाची पिठी घेवून त्यात किसलेला किंवा चिरलेला गूळ, मीठ, सोडा, तेल घालून धिरड्याइतके पातळसर भिजवावे. सर्व पदार्थ एकजीव झाल्याची खात्री करावी. तवा मध्यम तापवून त्यावर तूप सोडावे आणि त्यावर पळी किंवा डावाने हे मिश्रण घालून गोल पसरावे. वाफ जात आली आणि घावना वाळल्यासारखा दिसू लागला की त्यावर अर्धा चमचा तूप सोडावे व उलटून घ्यावे. दोन्ही बाजूंनी तांबूस सोनेरी रंगापर्यंत भाजावे.
घाटलं : नारळ खोवून त्याचे दाटसर दूध काढावे. ते जवळ जवळ दोन ते अडीच वाट्या होते. त्यात खसखशीची पूड, साखर, वेलची पूड, केशर घालावे. या दुधाला एक उकळी आली की लगेच आच बंद करावी. काजू आणि बदामाच्या कापांनी सजावट करावी.
टिप- लहान चमचा - टिस्पून, मोठा चमचा - टेबलस्पून