साहित्य : 2 कप टरबुजाचा रस, 2 पॅकेट स्ट्रॉबेरी जेली पॅकेट, पुदिन्याचे पानं, कंडेन्स मिल्क, 10-12 चेऱ्या.
कृती : जेलीच्या पाकिटावर जे पाण्याचं प्रमाण दिलं असेल त्याहून एक कप पाणी कमी घ्या. पाकिटावरील सूचनेप्रमाणे जेलीचं मिश्रण तयार करा. गार झाल्यावर त्यात टरबूजच रस मिसळा. आकर्षक बाउलमध्ये सेट करा. वर थोडे कंडेन्स्ड मिल्क घाला. त्यावर चेरीचे गोळे पेरा. पुदिन्याचे पानं लावून सजवा.