लागणारे जिन्नस:
100 ग्रॅम मैदा, 25 ग्रॅम तूप, 50 ग्रॅम दळलेली साखर, 1/2 चमचा सोडा, 1/2 चमचा बेकिंग पावडर, 1 चिमूट सायट्रिक ऍसिड, 50 ग्रॅम कापलेले ड्राय फ्रूट(मनुके, बदाम, काजू इत्यादी), 2 थेंब व्हेनिला इसेंस, 100 ग्रॅम दूध.
करावयाची कृती:
मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा मैदा गाळायच्या गाळणीने दोन ते तीन वेळा गाळून घ्या. एका बाऊलमध्ये तूप आणि साखर हलके होईस्तोवर फेटा. नंतर त्यात दूध आणि मैदा हळू-हळू हाताने हालवत टाका. ड्राय फ्रूट आणि इसेंस टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
त्यानंतर ओव्हनमध्ये बेक होण्यासाठी ठेवून द्या. 20-25 मिनिटांनी सुरी टाकून पाहा. केक सुरीला चिपकला नसेल तर केक तयार झाला असे समजा. आइसिंग करून सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा