साहित्य : 200 ग्रॅम शेवया, 100 ग्रॅम साजूक तुप, इलायची 5 ग्रॅम, बदाम 25 ग्रॅम, काजू 25 ग्रॅम, साखर 100 ग्रॅम.
पूर्वतयारी : शेवया ताटात काढाव्यात. विलायचीची साल मोकळी करून बारीक पावडर करावी. बदाम व काजूचे बारीक तुकडे करावे. साखर स्वच्छ करून घ्यावी.
कृती : गॅसवर पातेले ठेवून त्यात तूप घालावे. तूप गरम झाल्यावर बदाम व काजूचे तुकडे घालून तळून घ्यावे. गॅसची आंच मंद ठेवावी. त्यात शेवया घालून सात मिनिटांपर्यंत भाजून घ्याव्यात.
आंच मंद ठेवून सारखे चमच्याने परतत रहावे. शेवयांना तांबूस रंग येईपर्यंत भाजत रहावे. सुरवातीस शेवया तुपात चांगल्या प्रकारे भिजतील याची खात्री करून घ्यावी.
शेवया भाजल्या गेल्यानंतर खमंग सुगंध दरवळायला लागेल. मग त्यात साखर, इलायची घालावी. संपूर्ण मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. पातेल्यावर तीन मिनिटांपर्यत झाकण ठेवावे.
पातेल्यात वाफ पकडल्यानंतर झाकण काढून एक ग्लास गरम पाणी घालावे. संपूर्ण मिश्रण मोकळे होईपर्यंत चमच्याने हळुवारपणे परतत रहावे. अशाप्रकारे स्वादिष्ट, जिभेला पाणी सोडणार्या शेवया तयार.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा