Publish Date: Mon, 19 May 2014 (15:00 IST)
Updated Date: Mon, 19 May 2014 (15:11 IST)
साहित्य : दुध अर्धा लिटर, दोन वाट्या क्रीम, एक चमचा कॉर्नफ्लोअर, दोन वाट्या पपई गर, साखर दोन वाट्या मिक्स फ्रूट इसेंस एक चमचा.
कृती : दुधात साखर व कॉर्नफ्लोअर घालून उकळून थोडे घट्ट करावे. थंड झाल्यावर क्रीम, पपईचा गर घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. फ्रिजरमध्ये सेट होण्यास ठेवावे तासभराने बाहेर काढून पुन्हा इसेंस घालून पुन्हा फिरवावे. परत सेट करण्यास ठेवावे.