साहित्य : चांगली पिकलेली पपई, त्याचा गर 4 वाट्या, थोडी साखर, 1 वाटी गर असेल तर 4-5 चमचे साखर, थोडे तूप.
कृती : चांगली पिकलेली पपई साल व बिया काढून अगदी बारीक चिरावी. या फोडी मिक्सरवर बारीक करावा म्हणजे गर तयार होतो. यात थोडी साखर घालावी. नंतर गर व साखर एकत्र चांगली मिसळावी व तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण साधारण जाड थर होईल इतके वाट्यात ओतावे. हे ताट कडक उन्हात 2-3 दिवस ठेवावे. हे वाळल्यावर पुन्हा असाच गर तयार करून त्याच ताटावर अगोदरच्या गरवर टाकून ताट उन्हात ठेवावे. चांगले कडक उन्हात वाळल्यावर चाकूने हळू हळू काढावे. ही पपईची पोळी घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी.