साहित्य : 5 कप ताजे अननस किसून रसासहित, 2 कप सफरचंद सोलून किसलेले, 4 मोठे चमचे लिंबू रस, 8 कप साखर, 4 कप पाणी.
कृती : एका पॅनमध्ये अननस, सफरचंद आणि लिंबू रस घालून 5 मिनिटे शिजवा. त्यात साखर घालून हळूहळू ढवळा आणि संपूर्ण विरघळवा आणि तो पाक घट्ट होईपर्यंत शिजवा. पाकावर फेस आला असल्यास काढून टाका. जॅम बरणीत भरून ठेवा.