Article Marathi Sweet Dishes %e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%a2%e0%a5%87 107060800011_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेढे

खवा साखर पिस्ते पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन

वेबदुनिया

साहित्य : अर्धा किलो खवा, 125 ग्रॅम साखर, केशर किंवा खाण्याचा केशरी रंग, पिस्ते.

कृती : खवा व साखर एकत्र करून मिसळावे व जाड बुडाच्या कढईत शिजवावयास ठेवावे. शिजत असताना सारखे घोटत राहावे. मिश्रणाची गोळी झाली, की खाली उतरवावे व पुन्हा घोटत राहावे.

ND
साधारण गार झाल्यावर त्यात केशरी रंग किंवा केशर व वेलदोड्यांची पूड घालावी. नंतर खवा साखरेचा गोळा ताटात काढून घेऊन मळावा. याप्रमाणे पेढे वळण्याइतपत गोळा घट्ट होईपर्यंत थांबून थांबून मळावे. नंतर पेढे वळावेत व हवे असल्यास त्यावर पिस्त्याचे काप व चारोळी किंवा साखरेचा चुरासुद्धा लावू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi