Article Marathi Sweet Dishes %e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%96%e0%a5%80%e0%a4%b0 109121900041_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फुलगोबीची खीर

फुलगोबीची खीर
MH News
MHNEWS
फुलगोबीची सुकी भाजी खाण्यापेक्षा वेगळं काही करता येईल का? असा जर तुमचा प्रश्न असेल, तर उत्तर आहे. 'होय'. फुलगोबीची खीर ही डीश जरा हटके आहे आणि यापासून काही वेगळं करून खाल्याचा आनंदही. ही खीर खाण्यास अतिशय सुंदर लागते.

साहित्य :- फुलगोबीचा किस, दूध एक लीटर, केवडा इसेंन्स, साखर दोन वाट्या, काजू, वेलची पावडर.

कृती :- प्रथम दूध उकळवायला ठेवावे, दूधाला उकळी येत असताना त्यात फुलगोबीचा किस टाकावा. हे दूध जवळजवळ अर्धे आटल्यावर त्यात साखर घालून पुन्हा आटवून घ्यावे. हे सर्व मिश्रण अर्धअधिक आटवून झाल्यानंतर थंड होण्यासाठी खाली उतरवून ठेवावे. थंड झाल्यावर त्यात वेलची, काजूचे तुकडे आणि केवडा इसेंन्सचे 5 थेंब टाकावेत. थंड झाल्यावर ही खीर पोळी व पुरीसोबत सर्व्ह करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi