साहित्य : अर्धी वाटी बदाम-बी, चार कप दूध, वेलदोडे, साखर.
कृती : बदाम गरम पाण्यात भिजत घालून, साल काढावी. नंतर बदामाचा गर अगदी बारीक वाटावा. एका पातेल्यात दूध तापत ठेवून, उकळी आल्यावर त्यात बदामाचा वाटलेला गर, वेलचीची पूड व चवीप्रमाणे साखर घालून पाच मिनिटे शिजत ठेवावे. गार झाल्यानंतर पिण्यास द्यावे.