बासुंदी
पौष्टिक व स्वादिष्ट बासुंदी
साहित्य : 3 लीटर दूध, 20 ग्रॅम इलायची, एक किलो साखर, 100 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम मनुका, 50 ग्रॅम चारोळी.
पूर्वतयारी : साखर निवडून घ्यावी. बदामचे बारीक तुकडे करावे. चारोळी व मनुका निवडून घ्यावी.इलायचीची साल काढावी व बारीक वाटून घ्यावी.
कृती : बासुंदी करण्यासाठी चांगल्या प्रतीचे दूध घ्यावे. म्हशीचे ताजे दुध मिळाल्यास अधिक चांगले. गॅसवर अँल्युमिनियमचे जाड व स्वच्छ पातेले ठेवून त्यात दूध तापण्सा ठेवावे. गरम होईपर्यंत गॅसची आंच जास्त ठेवावी. एकदा दूधाने उष्मांक गाठल्यानंतर ते उकळायला सुरवात होते. आता मंदाग्निवर हे उकळणे सुरू ठेवावे.
मोठ्या चमच्याने एकसारखे दूध ढवळत रहावे, महणजे ते भांड्याला लागणार नाही. दूध न लागता घट्ट करणे यात खरे कौशल्य आहे. साधारणतः 50 मिनिटे दूध घट्ट होते. मग त्यात साखर घालून ढवळून घ्यावी.
घट्ट झालेल्या दुधात बदामाचे बारीक तुकडे, इलायची, चारोळी व मनुका घालावी व संपूर्ण मिश्रण ढवळून घ्यावे. पातेले गॅसवरून उतरवून घ्यावे व चवदार, पौष्टीक, स्वादिष्ट बासुंदी तयार!